Karwa Chauth Vrat Katha 2024
Karwa Chauth Vrat Katha 2024Saam Tv

Karwa Chauth 2024 : करवा चौथच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान; अखंड सौभाग्यवती राहाल

Karwa Chauth : करवा चौथचे व्रत करताना प्रत्येक महिलेने आपल्या राशीनुसार काही गोष्टी दान केल्या पाहिजेत. त्या कोणत्या त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
Published on

करवा चौथचे व्रत प्रत्येक विवाहित महिलेसाठी महत्वाचे असते. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. पतीला चांगले आयुष्य लाभावे यासाठी व्रत करतात. महाराष्ट्रात देखील हा सण काही महिला साजरा करतात. या दिवशी पतीसाठी उपवास केला जातो. तसेच पतीच्या हातून काही पदार्थ खाऊन हा उपवास सोडला जातो. या उपवासामुळे महिलेला अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे. त्यामुळे आज या बातमीमधून राशीनुसार या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे याची माहिती जाणून घेणार आहोत.

Karwa Chauth Vrat Katha 2024
Karwa Chauth 2023 : 'करवा चौथ' व्रत कधी आहे? अविवाहित स्त्रियांसाठी अधिक महत्त्वाचे, जाणून घ्या व्रताचे नियम

मेष : मेष राशीच्या महिलांना या दिवशी लाल वस्त्रांचे दान करणे शुभ आहे.

वृषभ : वृषभ राशीच्या महिलांनी या दिवशी गुलाबी बांगड्या दान केल्या पाहिजे.

मिथुन : मिथुन राशीच्या महिलांनी या दिवशी मेहंदी दान केली पाहिजे.

कर्क : कर्क राशीच्या महिलांनी या दिवशी मंदिरात जाऊन सिंदुर दान केले पाहिजे.

सिंह : सिंह राशीच्या महिलांनी करवा चौथला पायातील पैंजण दान करणे शुभ मानले जाते.

कन्या : कन्या राशीच्या महिलांनी या शुभ दिनी फुलांचे दान केले पाहिजे.

तूळ : ज्या महिलांची रास तूळ आहे त्यांनी या दिवशी आलताचे दान करावे.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या महिलांनी या दिवशी लाल ओढणीचे दान नक्की करावे.

धनु: धनु राशीच्या महिलांनी करवा चौथच्या दिवशी पिवळ्या साडीचे दान केले पाहिजे.

मकर : मकर राशीच्या महिलांनी आजच्या दिवशी काजळ दान केले पाहिजे.

कुंभ : कुंभ राशीच्या महिलांनी या दिवशी कोणत्याही प्रकारचे वस्त्र दान करावे.

मीन : मीन राशीच्या महिलांनी या शुभ दिनी मेकअपशी संबंधित वस्तूंचे दान केले पाहिजे.

करवा चौथच्या दिवशी राशीनुसार या वास्तू दान करणे शुभ आणि भाग्याचे मानले जाते. ज्या महिलांच्या वैवाहिक जीवनात सुख नाही त्यांनी हा उपाय करावा, असे ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे. हा उपाय केल्याने संबंधित व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुधारते. तसेच या महिलेला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Karwa Chauth Vrat Katha 2024
Celebrity And Karwa Chauth: पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी 'हे' सेलिब्रिटी करतात करवा चौथचे व्रत; रणवीर, विराटसह अनेक स्टार्सचा आहे लिस्टमध्ये समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com