Jio Tag Launched: Jio ने वाढवलं Appleचं टेन्शन ! जिओ टॅगचं भन्नाट फीचर; यूजर्सचं डोकं बाद करणार

Reliance Jio Tag Launch: रिलायन्स जिओने जिओ टॅग लॉन्च केला आहे. हा टॅग एक ब्लुटूथ डिव्हाइस आहे
Jio Tag
Jio Tag Saam tv
Published On

Reliance Jio Tag Vs Apple AirTag: रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते. त्यात जिओ सिनेमा, ओटीटी सबस्क्रिप्शन, रिचार्ज, जिओ फोन व जिओ फायबर असे अनेक नवीन पर्याय ही जिओने उपलब्ध करुन दिले आहे.

नुकतेच रिलायन्स जिओने जिओ (Jio) टॅग लॉन्च केला आहे. हा टॅग एक ब्लुटूथ डिव्हाइस आहे. जे सध्या भारतात लॉन्च करण्यात आले आहे. जो Apple च्या एअरटॅगला टक्कर देऊ शकतो. याची किंमत एअरटॅगपेक्षाही कमी आहे.

Jio Tag
Jio Recharge Plan : रिचार्ज करण्याची झंझट नकोच ! ७ रुपयात Jio चा स्वस्तात मस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉलिंगसह 5GB डेटाही फ्री...

1. जिओ टॅगची किंमत (Price)

जिओ टॅगची किंमत 2199 रुपये आहे. मात्र ते आपल्याला 749 रुपयांना मिळत आहे. Apple AirTag ची किंमत 3,490 रुपये आहे. आणि जर तुम्ही 4 टॅगचे पॅक विकत घेतले तर तुम्हाला 11,900 रुपये द्यावे लागतील. हे जिओ टॅग आपण ऑनलाइन वेबसाइटवरून खरेदी करु शकतो.

2. स्पेसिफिकेशन्स

जिओटॅग ब्लूटूथ कनेक्टेड डिव्हाइसेस शोधण्यासाठी वापरला जाणार आहे. याच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे झाले तर Jio च्या टॅगचे वजन 9.5 ग्रॅम आहे. हे वापरण्यासाठी अधिक हलके आहे. युजर्स आपला डिव्हाइस त्यांच्या स्मार्टफोनला कनेक्ट करु शकतात. टॅगच्या मदतीने वापरकर्ते ते त्यांच्या हँडबॅग, वॉलेट किंवा इतर कोणत्याही वस्तूवर ठेवू शकतील. Jio टॅगच्या मदतीने युजर्स त्यांचा फोन शोधू शकतील. जिओ कम्युनिटी फाइंड नेटवर्कसह, तुम्ही तुमच्या हरवलेल्या वस्तू शोधू शकता. Jio टॅगसह फ्रीमध्ये बॅटरी आणि केबल ऑफर केली जात आहे.

Jio Tag
Jio Recharge Plan : खुशखबर ! 599 रुपयात अनलिमिटेड डेटा-कॉलिंग; 15 OTT Subscription फ्री, कसे ते पाहा

3. कनेक्टिव्हिटी

जिओ टॅग हा वापरण्यासाठी अगदी हलका असून त्याचे डायमेंशन हे 3.82x 3.82x0.72 असा आहे. यावरुन आपल्याला स्मार्टफोन, वॉलेट, हँडबॅग ट्रॅक करता येईल असे जिओने सांगितले आहे. जिओटॅग 20 मीटर इनडोअर कनेक्टिव्हिटीसह येतो. तसेच बाह्य कनेक्टिव्हिटी 50 मीटर आहे. Airtag मध्ये ब्लूटूथ 5.1 कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहे. हरवलेला स्मार्टफोन तुम्ही जिओटॅगद्वारे शोधू शकता. यामध्ये सायलेंट मोडही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com