सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक सेल सुरु झाले आहेत. नवनवीन प्रोडक्ट्स बाजारात लाँच होत आहेत. यातच रिलायन्स जिओने Jio Bharat B1 सीरीज लाँच केली आहे. या नवीन सीरीजमधील Jio Bharat B1 हा फोन लाँच केला आहे.
रिलायन्स जिओने या वर्षी जुलैमध्ये इंटरनेट सेवा असलेली 4G सीरीज Jio Bharat लाँच केली होती. या फोनची किंमत जिओच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
किंमत
Jio Bharat 4G फोनची किंमत 1299 रुपये आहे. हा फोन काळ्या रंगात उपलब्ध आहे. अॅमेझॉनवरुन ग्राहक हा फोन ऑनलाइन खरेदी करु शकतात.
स्पेसिफिकेशन
Jio Bharat B1 फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन JioBharat फोनच्या डिस्प्लेपेक्षा मोठा आहे. फोन 4G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. त्यामुळे या फोनवर व्हिडिओ आणि गाणी ऐकू शकता. या फोनचे डिझाइन Jio Bharat फोनपेक्षा वेगळे आहे. नवीन फोनच्या मागील बाजूस मॅट फिनिशसह पॉली कार्बोनेट बॉडी आहे.
फिचर्स
Jio Bharat B1 मध्ये 200mAh बॅटरी आहे. ही बॅटरी एका चार्जवर फार काळ टिकू शकते असे कंपनीचे म्हणणे आहे. फोनमध्ये तुम्ही JioSaavan अॅपवरुन गाणी, JioCinema अॅपवरुन चित्रपट, शो पाहू शकता. तसेच JioPay अॅपवरुन UPI पेमेंट करु शकता. तसेच फोन 23 भाषांना सपोर्ट करतो.
डेटा प्लान
नवीन फोनसाठी दोन रिचार्ज प्लान आहेत. ज्यात 123 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवस अनलिमिटेड कॉल आणि 14GB डेटा मिळतो. तर 1234 रुपयांच्या प्लानमध्ये वार्षिक सबस्क्रिप्शन आहे. यात अनलिमिटेड कॉल आणि 168GB डेटा मिळतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.