Relationships Tips: बायकांचा सल्ला पुरुषांपेक्षा योग्य कसा ठरतो? काय आहे रिसर्च

Women Opinions Gender Roles: महिलांचा सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेणे सोपे होते. तुम्हीही हे केले तर तुमचे काम अधिक सहजतेने होऊ शकते. हे आम्ही नाही तर एका संशोधनात माहिती समोर आलीय.
Relationships Tips
Women Opinions Gender Roles
Published On

महिलांनी सल्ला दिल्यानंतर निर्णय घेणं सोपं जातं ही बाब एका संशोधनातून समोर आलीय. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महिलांकडून मार्गदर्शन, सल्ला घेतल्याने किंवा त्यांच्याकडे एखादी समस्या मांडली तर त्या समस्येचं समाधान चांगल्याप्रकारे करत असतात. तसेच निर्णय घेण्यातील चुकादेखील कमी होतात, असा मोठा खुलासा एका संशोधन अभ्यासातून झालाय. महिला अनेक बाबींवर विचार करतात. मदतीला प्रधान्य देतात आणि पुरुषांच्या तुलनेत त्या चांगले विचार आणि मत मांडत असतात. त्यामुळे यश मिळत असतं, असं या अभ्यासात म्हटलंय.

विशेष गोष्ट म्हणजे हा अभ्यास पारंपारिक लिंग भुमिकांना आव्हान देणारा आहे. कारण महिला भावनिक असतात, त्या बऱ्याचवेळा त्याचप्रमाणे विचार करतात, असं म्हटलं जातं. मात्र संशोधनात वेगळंच सत्य समोर आलं. याउलट पुरुष घरी आणि ऑफिसमध्ये आव्हानात्मक निर्णय घेत असतात. दरम्यान हा संशोधन अभ्यास घर आणि ऑफिसबाबत महिलांचा दृष्टीकोन काय यावर प्रकाशझोत टाकणारा आहे. महिलांचा सल्ला घेतल्यानंतर फक्त यश येत नाही तर आनंद देखील मिळत असतो, असा दावा या अभ्यासातून करण्यात आलाय.

Relationships Tips
Cancer: जीवनशैलीतील बदल आणि पर्यावरणीय असंतुलनाचा आरोग्यावर परिणाम; स्तन, फुफ्फुस, लिव्हरचा कॅन्सर झपाट्याने वाढतोय

बऱ्याचवेळा पुरूष आपल्या मुलांसमोर आपल्या पत्नीला रागावत असतात. त्यामुळे त्यांचा आत्म-सन्मान कमी होत असतो. दरम्यान पती आणि पत्नी हे दोघे मुलांसमोर एकसंघ असतात. त्यामुळे दोघांमध्ये काही वाद असेल तर त्या समस्या किंवा शंका आपआपसात मिटवून घेतल्या पाहिजेत. मग ती स्त्री बायको, असेल किंवा मैत्रिण असेल किंवा प्रेयसी असेल. आर्थिक समस्या असेल तर तु्म्ही त्याबाबत सल्ला घेण्यासाठी पत्नीला विचारतात.

Relationships Tips
Office Style for Women: कामाच्या ठिकाणी बदला कपड्यांची स्टाईल, एक्सपर्टने सांगितल्या महिलांसाठी खास टिप्स

मग ते गुंतवणूक करणं असो की, पैशांची बचत, त्याबाबतचा सल्ला महिलेकडून घेतला तर त्या योग्य मत मांडतील आणि योग्य निर्णय घेण्यास भाग पाडतील. महिला कदाचित तांत्रिकपद्धतीने गुंतवणुकीचा सल्ला देऊ शकणार नाहीत, पण हे कशाप्रकारे करायचं आहे, हा सल्ला त्या योग्य प्रकारे देतात. तसेच महिला कुटुंबाचा विचार करत असतात, तेव्हा त्या आपल्याला किती गरज आहे, तितकाच पैसा त्या खर्च करतात. तसेच नवरा बायकोला दर महिन्याला किती पैशांची बचत करावी लागले. याचा सल्ला देखील महिला योग्य देतात. मग ती कामाशी संबंधित तक्रार असो, किंवा घरातील काही समस्या असो, स्त्रिला फक्त अशा व्यक्तीची गरज असते जी व्यक्ती तिचे म्हणणे ऐकून घेईन. स्त्रिया पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात आणि आपली गोष्ट करून घेण्याबाबत त्या हुशार असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com