Relationship Tips: पती पत्नीच्या नात्यात 'या' कारणांमुळे येतो दुरावा; अन् होतो घटस्फोट

Divorce Rate: आजकालच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढतांना दिसत आहेत. घटस्फोटाची अनेक कारणे असू शकतात. पण काही असे करणं समोर आले आहेत, ज्यामुळे गेल्या काही वर्षात प्रामुख्याने घटस्फोट झाले आहेत.
Relationship Tips
Relationship TipsCanva

Relationship Tips : लग्न म्हणजे जन्म-जन्माचे पवित्र बंधन. पण आजच्या काळात ही व्याख्या पूर्णपणे बदलताना दिसत आहे. आता लग्नानंतर या जन्मातही पती-पत्नीचे नाते टिकून राहणार की नाही असा प्रश्न पडतो. कोणतेही नाते मजबूत होण्यासाठी वेळ लागतो. आजकलच्या जोडप्यांमध्ये संयम, विशवास खूप कमी आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडण होताना दिसतात. त्या भांडणाचे परिणाम घटस्फोटापर्यंत पोहचते. अनेकवेळा असं पहायला मिळतं की कपल्समध्ये एकमेकांची कदर केली जात नाही. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण होतं. यावेळी दोघांपैकी एकजण असे काही बोलून जातो ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनाला ती गोष्ट लागते.

Relationship Tips
Relationship Tips : ब्रेकअप करण्यापूर्वी या ५ गोष्टी लक्षात ठेवा, नात्यातील दूरावा होईल कमी

रिलेशनशिपमध्ये काही दिवसांनंतर जोडपे एकमेकांकडून अपेक्षा करू लागतात. काही वेळा काही अपेक्षा पूर्ण होत नाही त्यामुळे नात्यामध्ये फुट पडू लागते. अनेकवेळा जास्त भांडण झाल्यावर कपल्स एकमेकांना आपल्या मनातील गोष्ट सांगत नाही. त्या कारणामुळे कम्युनिकेशन गॅप निर्माण होत असतो. कम्युनिकेशन गॅप हे घटस्फोटाचे प्रमुख कारण आहे. कपल्स त्याच्या मनातील गोष्टी मनमोकळेपणाने बोलत नाहीत. त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. सध्या नवरा-बायको दोघेही नोकरी करतात, त्यामुळे कुटुंबाची जवाबदारी चांगल्या पद्धतीने घेतली जात नाही. यामुळे नात्यामध्ये ताण निर्माण होतो आणि अनेकदा एकमेकांवर अपशब्द वापरले जातात. कपल्समध्ये एकमेकांना समजून घेण्याची क्षमता देखील कमी झाली आहे, या कारणामुळे नाते कुमकुवत होते. नात्यामध्ये समजूदारपणा नसल्यामुळे भांडणं जास्त वाढू लागतात त्याचा परिणाम घरातील वातावरणावर दोखील होतो.

घरात सातत्याने भाडणं होऊ लागले की टोकाचे निर्णय घेतले जातात. नात्यामध्ये फुट पडण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या जोडीदाराला फसवणे. आपण रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या व्यक्तिसोबत जवळीक ठेवल्यामुळे नात्यात फुट पडते. आपल्या जोडीदाराचे मन दुखावते आणि त्यांनी माफ करण्याची शक्यता खूप कमी असते. वैवाहिक जीवनात पती-पत्नीने एकमेकांचा आदर करणे महत्त्त्वाचे आहे. नात्यात एकमेकांचा तिरस्कार किंवा अपमानाच्या गोष्टी आल्या तर प्रेम कमी होते आणि टोकाचे निर्णय घेतले जातात.

आजच्या काळात आर्थिक परिस्थितीमुळे देखील घटस्फोटाचे होतात. पैशांवरून पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होतांना दिसतं. जास्त खर्च झाल्यामुळे किंवा काही गोष्टी न मिळाल्यामुळे भांडण होतात. यासर्व गोष्टींमुळे नात्याधील तणाव वाढतो आणि त्याचे रुपांतर घटस्फोटामध्ये होते. अनेकवेळा सासरचे लोक पती-पत्नीच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ करतात, त्यामुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होतात. अनेकवेळा कुटुंबाच्या या एका चुकीमुळे पती-पत्नीमधील अंतर इतके वाढते की, त्यांच्याकडे घटस्फोटाशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com