Diwali 2024 Rangoli Tips: घरीच बनवा रांगोळीचे आकर्षक रंग, करा सोपी परफेक्ट पद्धत ट्राय

Diwali 2024: रांगोळ्यांमध्ये एक प्रॉब्लेम नेहमी होतो तो म्हणजे, तुम्हाला हवे असलेले रंग बाजारात मिळत नाहीत.
Diwali 2024
Diwali 2024 Rangoli Tipssaam tv
Published On

दिवाळीला आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दिवस बाकी राहिले आहेत. आता प्रत्येक घर आपल्याला दिव्यांच्या लख्ख प्रकाशात दिसणार आहे. प्रत्येक जण दारात कंदील, पणत्या, रांगोळ्या काढून घर सजवताना दिसणार आहे.

रांगोळ्यांमध्ये एक प्रॉब्लेम नेहमी होतो तो म्हणजे, तुम्हाला हवे असलेले रंग बाजारात मिळत नाहीत. अशावेळी रांगोळी प्रेमी नाराज होतात. मात्र हा प्रॉब्लेम अगदी क्षणात सोडवण्यासारखा आहे.

तुम्हाला तुमच्या मनासारखा रंग घरी कसा तयार करायचा याचे बरेच व्हिडिओ सोशल मिडियावर मिळू शकतात. त्याआधी तुमचे मागच्या वर्षीचे रंग उरलेत का? याचा शोध घ्या. त्यात जे रंग उपलब्ध आहेत, त्यापासून तुम्ही वेगवेगळे रंग घरीच तयार करु शकता. रांगोळी कोणत्या रंगाने आकर्षित कराल आणि कोणते रंग तुम्ही घरी तयार कराल. याच्या काही खास टिप्स पुढील प्रमाणे आहेत.

जे लोक सुंदर रांगोळी काढतात, त्यांना रंग भरताना अडचण येते कोणता रंग कुठे भरायचा? यात त्यांचा गोंधळ होतो.यासाठी पुढील टिप्स खूप फायदेशीर ठरणार आहे.

तांबडा आणि पिवळा रंग एकत्र करुन तुम्ही नारंगी रंग तयार करु शकता.

पिवळा आणि हिरवा रंग एकत्र करुन तुम्ही पोपटी रंग तयार करु शकता.

हिरवा आणि काळा रंग एकत्र करुन तुम्ही काळसर हिरवा रंग तयार होतो.

पांढरा आणि पिवळा रंग एकत्र करुन तुम्ही पुसट पिवळा रंग तयार करु शकता.

Diwali 2024
Diwali Special weight loss Plan: दिवाळीच्या दिवसात गोडधोड खाणार असाल तर कसं ठेवाल वजन नियंत्रणात

काळ्या रंगात पांढरा रंग एकत्र केला तर राखाडी रंग तयार करु शकता.

नारंगी रंगात पांढरी रांगोळी एकत्र केली तर बदामी रंग तयार होतो.

जांभळ्या रंगात पांढरी रांगोळी एकत्र केली तर कोनफळी रंग तयार होतो.

रांगोळीत रंग भरताना या टिप्स फॉलो करा. दोन

डार्क रंग शेजारी-शेजारी वापरू नका.

दररोज रांगोळीचे रंग बदलत राहा.

लहान रांगोळीत दोन किंवा तीनच रंग भरा.

रांगोळी पूर्ण काढून झाल्यावर वरून चमकी (सोनेरी, चंदेरी) टाकावी.

दिवाळीत रोज विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे नवीन रंग घरच्या घरी तयार करू शकता आणि तुमची रांगोळी आकर्षित करू शकता.

Written By: Sakshi Jadhav

Diwali 2024
Diwali Faral Recipe : फक्त १० मिनिटांत करा ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत चकली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com