रमजान म्हणजे एक पवित्र महिना. या महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव उपवास करतात. उपवास करताना अनेक जण दिवसभर अगदी पाणी सुद्ध पीत नाहीत. महिनाभराचा हा उपवास झाल्यानंतर सर्वजण ईदच्या दिवशी जंगी सेलिब्रेशन करतात. या सेलिब्रेशनमध्ये सर्वांच्या घरी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शीर खुरमा.
भारतासह पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये देखील ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वजण एकमेकांना विविध गिफ्ट्स आणि शुभेच्छा देतात. शीर-खुरमा देऊन सर्वांचं तोंड गोड करतात. महाराष्ट्रात इतर धर्मीय व्यक्तींना देखील शीर-खुरमा फार आवडतो. त्यामुळे आज या शीर-खुरमाची परफेक्ट रेसिपी जाणून घेऊ.
500 मिली दूध
50 ग्रॅम शेवया
2 मोठे चमचे खजुराचे काप
पाव कप बदामाचे काप
पाव कप साखर
पाव कप काजू
पाव कप पिस्ता
पाव कप तूप
पाव कप मनुका
छोटा अर्धा चमचा वेलची पूड
शीर-खुरमा बनवण्यासाठी सर्वात आधी एक पातेलं घ्या. त्यात थोडं तूप टाकून सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स चांगले भाजून घ्या. भाजलेले ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर यामध्ये शेवया खरपुस भाजून घ्या. भाजलेल्या शेवया देखील काढून घ्या.
पुढे याच पात्रात दूध तापण्यासाठी ठेवा. दुधाला एक उकळी आली की, यामध्ये सखर अॅड करा. साखर विरघळून दूध निम्म होईपर्यंत मंद आचेवर गरम करत राहा. दूध सतत आधूनमधून चमच्याने ढवळत राहा. अन्यथा दूध करपते.
पुढे या दूधात शेवया आणि शॅलो फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स अॅड करा. त्यानंतर एक ते दोनवेळा उकळी आल्यावर दूध खाली उतरवून ध्या. नॉर्मल टेंम्परेचरवर आल्यानंतर ते फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. तयार झाला तुमचा चविष्ट शीर-खुरमा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.