Ram Temples In India: अयोध्येसोबतच देशातील 'ही' राममंदिरे आहेत खास

Ram Navmi 2024 Special | Famous Ram Temples in India: देशभरात रामनवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. रामनवमीनिमित्त देशातील अनेक राममंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांना गर्दी केली आहे. भारतात अयोध्येसोबतच इतर अनेक ठिकाणी रामाची भव्य मंदिरे आहेत. जिथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला या मंदिरांची माहिती देणार आहोत.
Ram Temples In India: अयोध्येसोबतच देशातील 'ही' राममंदिरे आहेत खास
List of Famous Ram Temples In India You Must VisitGoogle
Published On

List of India's Famous Ram Temples

देशभरात रामनवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. रामनवमीनिमित्त देशातील अनेक राममंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांना गर्दी केली आहे. तब्बल ५०० वर्षानंतर राममंदिराची प्रतिष्ठापना अयोध्येत झाली आहे. त्यामुळे तिथे भाविकांनी गर्दी केली आहे. भारतात अयोध्येसोबतच इतर अनेक ठिकाणी रामाची भव्य मंदिरे आहेत. जिथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला या मंदिरांची माहिती देणार आहोत.

Ram Temples In India: अयोध्येसोबतच देशातील 'ही' राममंदिरे आहेत खास
Moonland of India in Ladakh: लेह लडाखमधील मूनलँड माहितीये का? चंद्रासारखे असणाऱ्या या ठिकाणाला नक्की भेट द्या

काळाराम मंदिर, नाशिक

नाशिकमधील काळाराम मंदिर खूप जास्त प्रसिद्ध आहे. येथे श्रीरामाची दोन फूट उंचीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. त्यामुळेच मंदिराला काळाराम असे नाव पडले आहे. या मंदिराच्या परिसरात श्रीरामांनी वनवासातील दहा वर्ष घालवली होती.

रघुनाथ मंदिर, जम्मू

जम्मूमधील रघुनाथ मंदिर हे भगवान रामाचे मंदिर आहे. हे मंदिर खूप सुंद आहे. येथे तुम्हाला मुघल शैलीतील कोरीवकाम पाहायला मिळेल. या मंदिर परिसरात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत.

रामराजा मंदिर, मध्यप्रदेश

मध्यप्रदेशमधील ओरछा येथे राममंदिर आहे. जेथे श्रीरामाची पूजा एक राजा म्हणून केली जाते. मंदिराची रचना ही किल्ल्यासारखी आहे. मंदिरात दररोज गार्ड ऑफ ऑनर केला जातो. राजा रामाला वंदन केले जाते.

Ram Temples In India: अयोध्येसोबतच देशातील 'ही' राममंदिरे आहेत खास
Moonland of India in Ladakh: लेह लडाखमधील मूनलँड माहितीये का? चंद्रासारखे असणाऱ्या या ठिकाणाला नक्की भेट द्या

सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा

तेलंगणामध्ये सीता रामचंद्रस्वामी हेदेखील सुंदर मंदिर आहे. या मंदिराविषयी अशी गोष्टी आहे की, श्रीरामाने सीतेला लंकेतून आणण्यासाठी गोदावरी नदी पार केली होती. ते हेच ठिकाण आहे. येथील रामाची मूर्ती त्रिभंग रुपात आहे.

त्रिप्रयार श्री राम मंदिर, केरळ

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील त्रिपयार मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. येथील स्थापित रामाच्या मूर्तीची पूजा स्वतः भगवान श्रीकृष्णाने केली होती, असे म्हटले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com