Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना म्हणा हा मंत्र, वाचा सविस्तर
Raksha Bandhan Shubh Muhurt : भाऊ आणि बहिणींच्या अतुट नात्यांचा हा पवित्र सण आज भारतात सगळीकडेच किंवा काही ठिकाणी उद्या 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाचा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो आणि यावेळी पौर्णिमा 30 आणि 31 ऑगस्ट या दोन्ही तारखेला आली आहे, अशा स्थितीत राखी बांधण्याबाबत संकोच व्यक्त केला जात आहे.
रक्षाबंधनाच्या सणाची भाऊ-बहिणी वर्षभर वाट पाहत असतात. भारतीय (Indian) परंपरेचा हा सण सामाजिक नात्यालाही घट्ट करतो. चला तर जाणून घेऊया राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा…
राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी श्रावण पौर्णिमा 30 आणि 31ऑगस्ट या दोन दिवशी आहे. यासोबतच श्रावण पौर्णिमेला भद्राची सावलीही राहील.
धार्मिक श्रद्धेनुसार, भद्राच सावट असताना रक्षाबंधन कधीही साजरे (Celebrate) केले जात नाही. ग्रह संक्रमण पंचागानुसार, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:58 पासून भद्रा सुरू होईल. जे रात्री 9 वाजून 1 मिनिटापर्यंत चालेल. त्यामुळे भद्रामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते. भद्रामध्ये केलेले कोणतेही शुभ कार्य कधीच सफल होत नाही.
राखीचा मंत्र
येन बद्धो बलि राजा,दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:।।
अर्थ
मी तुला त्याच रक्षासूत्राने बांधते ज्याने महान आणि शक्तिशाली राक्षस महावलीला बांधले होते, जे नेहमी तुझे रक्षण करेल. हे रक्षासूत्र हरवू नको. राखी बांधताना बहिणी या मंत्राचा पाठ करू शकतात. तसेच या मंत्राशी संबंधित कथा वामन पुराण, भविष्य पुराण आणि विष्णु पुराणातही आढळते.
सण कसा साजरा करतात
बहिणीचे तोंड पश्चिम दिशेला आणि भावाने पूर्व दिशेला बसावे. बहिणी भावाच्या कपाळावर रोळी, चंदन आणि अक्षता तिलक लावतात. भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधतात. राखी बांधताना या मंत्राचा जप करावा.
रक्षासूत्र बांधताना या मंत्राचा जप केल्यास अधिक फळ मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. यानंतर बहिणी (Sister) भावाला मिठाई खाऊ घालतात. राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणींना भेटवस्तू आणि पैसे देतात आणि बहिणींचे आशीर्वाद घेतात. राखी बांधताना भावाच्या दिर्घायुष्याची, सुखाची आणि प्रगतीची कामना करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.