Railway Ticket Rule: रेल्वेत तिकीट न काढताही करता येईल प्रवास; नियमानुसार काय असेल पुढील प्रक्रिया?

विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास तुम्हाला दंड तसेच भाडं भरावं लागतं.
Railway, Train, parbhani
Railway, Train, parbhaniSaam Tv

Railway Ticket Rule : रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवास करायचं म्हटलं की त्याचं योग्य नियोजन करावं लागतं. काही दिवस आधीच रेल्वेचं तिकीट बूक करावं लागतं. मात्र जर तुम्हाला अचानक कुठे जायचं असेल तर काय? कमी वेळेत रेल्वेचं तिकीट काढता आलं नाही तर काय? मग तुमच्याकडे काय पर्यायी मार्ग उरतो, याबाबत माहिती घेऊया.

तुम्ही घाईघाईत ट्रेनमध्ये तिकीट न काढता चढलात आणि तुम्हाला टीसीने पकडलं तर तुम्हाला तुमचं प्रवास भाडं भरावं लागतंच. सोबत काही प्रमाणात दंडही भरावा लागतोच. मात्र दंड भरण्यासापासून तु्म्हाला वाचायचं असेल तर रेल्वेच्या नियमावलीत काय तरतूद आहे, यावर एक नजर टाकूया. (Latest News Update)

Railway, Train, parbhani
Beed Rain News: मांडव सजला, वऱ्हाडी जमले... पण अवकाळीनं सर्वांच्याच आनंदावर पाणी फेरलं; मन हेलावणारा VIDEO

रेल्वेत विनातिकीट प्रवास करणे दंडात्मक गुन्हा आहे. असं करताना तुम्ही आढळल्यात तुम्हाला दंड भरावा लागेलत, याशिवाय तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास कधीकधी तिकीट दरापेक्षाही जास्त दंड भरावा लागू शकतो.

Railway, Train, parbhani
Pune Accident News: डंपरची बाईकला जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद

दंड वाचवण्यासाठी काय कराल?

जर तुम्ही घाईघाईत ट्रेनचं तिकीट खरेदी करु शकत नसाल तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट काढून प्रवास करु शकता. त्यानंतर ट्रेनमध्ये चढून तुम्हाला सर्वात आधी प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन टीसीकडे जावं लागेल.

तुम्हाला कुठपर्यंत प्रवास करायचा आहेत याबाबची माहिती टीसीला द्यावी लागेल. त्यानंतर टीसी तुम्हाला तुमच्या प्रवासाचं तिकीट तयार करुन देईल. जर ट्रेनमध्ये सीट रिकामी असेल तर तुम्ही त्या सीटवर बसू शकता. अशारितीने तुम्ही तिकीट न काढताही आरामात प्रवास करु शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com