सध्या सणावारांमध्ये सगळेच कामात धावपळीत गुंतलेले असतात. त्यात जे लोक सकाळीच घर सोडतात त्यांना बाहेरचे पदार्थ खावे लागतात. काही लोक नाश्त्यासाठी बाहेरचे तळलेले, अस्वच्छ पदार्थ नेहमी खातात. त्यांच्या या सवयीमुळे त्यांना भविष्यात खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. याचा विचार करुन आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम रेसिपी आणली आहे. ती म्हणजे नाचणीचे डोसे. नाचणी ही ग्लुटेन फ्री असते. त्यामुळे तुम्ही निरोगी तर राहाल. तसेच तुम्हाला कोणत्याही अपचनाच्या समस्या होणार नाहीत. चला तर पाहुया रेसिपी.
नाचणीचा डोसा तयार करण्याचे साहित्य
१ वाटी नाचणीचे पीठ
१ वाटी उडीद डाळीचं पीठ
१ चमचा बडिशेप
२ चमचे लिंबाचा रस
२ मिरच्या
पाव वाटी कोथिंबीर
१ चमचा आलं-लसुन पेस्ट
मीठ
कृती
सर्वप्रथम तम्ही उडदाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घाला. ४ तास डाळ भिजत घाला. नंतर डाळ मिक्सरमध्ये वाटून त्याची बारिक पेस्ट तयार करा. आता नाचणीचं पीठ, उडीद डाळ, बडिशेप, मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ मिक्सरमध्ये बारिक करुन घ्या. हे संपु्र्ण मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. आता त्यात लिंबाचा रस मिक्स करा.
त्यात पाणी आणि चविनुसार मीठ एकत्र करा. आता तुम्ही तवा गरम करा. तवा गरम झाल्यावर त्याला तेल किंवा बटर लावून बॅटर लावून डोसा तयार करु शकता. हा डोसा तुम्ही चटणीचा वापर न करता प्रवासात खावू शकता.
Written By: Sakshi Jadhav