मुदतपूर्व म्हणजेच वेळेआधी बाळाचा जन्म होणे हा एक चिंतेचा विषय आहे. दरवर्षी लाखो बाळांचा वेळेआधी जन्म होतो. गर्भधारणेच्या 24 ते 34 आठवड्यांमध्ये आणि 34 ते 37 आठवड्यांदरम्यान गर्भाशयाचे मुख उघडते तेव्हा अकाली प्रसूती होते.
जितक्या लवकर बाळाचा अकाली जन्म होईल तितका जास्त आरोग्याविषयक धोका अधिक असतो. अनेक अकाली जन्मलेल्या बाळांना नवजात अतिदक्षता विभाग (NICU) मध्ये दाखल करण्याची आवश्यकता भासते. या विषयावर वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रसाद कुलट यांनी माहिती दिली आहे. वेळेआधीच बाळ जन्माला येण्याची कारणे, लक्षणे आणि जोखमेच्या घटकांवर डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं आहे.
मुदतपूर्व प्रसूतीची कारणे काय?
जर तुम्ही अकाली बाळाला जन्म दिला असेल, जुळी अथवा तिळी असा एकाधिक गर्भ असलेल्या महिला गर्भाशयासंबंधी काही समस्या असतील तर अकाली प्रसूती होण्याची शक्यता अधिक असते. गर्भधारणा होण्याआधी योनीमार्ग, गर्भाशय मुखासंबंधी काही समस्या आढळल्यास मुदपूर्व प्रसुतीची शक्यता असते, असं डॉ. प्रसाद कुलट यांनी म्हटलं.
पूर्वीच्या मुदतपूर्व प्रसूतीचा किंवा अकाली जन्मलेल्या बाळाची तब्येत, एकापेक्षा जास्त गर्भ धारणा असणे, गर्भाशय मुख लहान असणे, गर्भाशयाच्या किंवा प्लेसेंटल समस्या असणे, धूम्रपान किंवा बेकायदेशीर औषधांचा वापर करणे ही कारणे देखील असू शकतात.
लक्षणे कोणती?
याबाबतच्या लक्षणांची माहिती देताना डॉ. प्रसाद कुलट यांनी सांगितलं, एका तासाच्या आत सतत कळा अनुभवणे जे शारीरिक स्थिती बदलल्यानंतर किंवा पुरेसा आराम केल्यावरही कमी होत नाही. अधूनमधून किंवा सतत पाठीच्या खालच्या भागात दुखणे. ओटीपोटात वेदना, काहीवेळेस अतिसारासह वेदना आढळून येणे. ओटीपोटात किंवा योनीमध्ये वाढलेला दाब वाढणे.
सतत मासिक पाळीसारख्या वेदना होणे, योनीवाटे येणारा स्त्राव वाढणे, शक्यतो गुलाबी किंवा श्लेष्मासारखा रंग योनीवाटे बाहेर पडणारे द्रवपदार्थ, अम्नीओटिक द्रवपदार्थ, योनीवाटे रक्तस्त्राव होणे, मळमळ आणि उलट्या अशी फ्लू सारखी लक्षणे जाणवणे, गर्भाच्या हालचाली कमी होणे अशी कही लक्षणे मुलं वेळेआधी जन्माला येण्याआधी दिसतात.
वेळेत प्रसूती होण्यासाठी उपाय?
गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर वेळेत प्रसूती व्हावी यासाठी तणावाचे कमी करणे, मेडिटेशन आणि विश्रांती घेणे गरजेचे असते. बाळाचे आणि आईचे आरोग्य चांगले रहावे यासाठी नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करणे व तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार घेणे, अशी माहिती डॉ. प्रसाद कुलट यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.