Simple Tricks For Pimple: आंबा खाल्ल्याने तुमच्याही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग 'या' सिंपल ट्रिक्स एकदा ट्राय तर करा

Tricks To Avoid Pimples After Eating Mangoes: मात्र आंब्याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे अनेकांना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याच्या समस्या देखील निर्माण होतात.
Simple Tricks For Pimple: आंबा खाल्ल्याने तुमच्याही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग 'या' सिंपल ट्रिक्स एकदा ट्राय तर करा
Tricks To Avoid Pimples After Eating MangoesSaam TV

How To Avoid Pimples After Eating Mangoes:

उन्हाळ्यात बाजारात सर्वत्र फळांचा राजा आंबा दाखल होतो. रसाळ आणि मधाळ असा आंबा वर्षातून एकदच येतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती उन्हाळ्यात मनसोक्त आंबे खातात. काही व्यक्ती तर दररोज जेवणाबरोबर एक आंबा नक्की खातात. मात्र आंब्याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे अनेकांना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याच्या समस्या देखील निर्माण होतात.

Simple Tricks For Pimple: आंबा खाल्ल्याने तुमच्याही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग 'या' सिंपल ट्रिक्स एकदा ट्राय तर करा
Ice On Pimples : मुरुमांवर बर्फ लावणे योग्य की, अयोग्य ? कशी घ्याल त्वचेची काळजी

शरीरातील उष्णता वाढल्याने ती चेहऱ्यावर लगेच दिसून येते. आंबा खाल्याने काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर फार मोठे फोड येतात. ते चेहऱ्यावर फार वाईट दिसते आणि दुखतात देखील. त्यामुळे आज आंबा खाल्ल्याने तुमच्याही चेहऱ्यावर फोड किंवा पिंपल्स येत असतील तर काय करावे या बाबत जाणून घेऊ.

योग्य प्रमाणात आंब्याचे सेवन

आंबा फार उष्ण असतो. आंबा तसेच फणस ही फळे चवीला फार छान आहेत. मात्र याचे जास्त सेवन केल्याने पोटात देखील गरम पडते. त्यामुळे रोज सलग आंबा खाऊ नका.

Simple Tricks For Pimple: आंबा खाल्ल्याने तुमच्याही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग 'या' सिंपल ट्रिक्स एकदा ट्राय तर करा
Home Remedy: घरातील डासांच्या समस्येने त्रस्त आहात, मग हे उपाय करुन पहा.

रात्री खाऊ नका

आंबा शकतो नुसता खाऊ नये. जेवणाच्यावेळी सर्व पदर्थांसोबत आंबा हे फळ खावे. त्याने सर्व पदार्थ योग्य प्रमाणात आहारात आल्याने आंबा पचण्यास मदत होते. काही व्यक्ती रात्री जेवणानंतर आंबा खातात मात्र असे केल्याने पोटात गरम पडते आणि चेहऱ्यावर देखील पिंपल्स येऊ शकतात.

हळद आणि साय

आंबा खाल्याने उन्हाळ्यात जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर रात्री झोपण्याआधी दुधाची साय आणि त्यात थोडी हळद मिक्स करून घ्या. ही पेस्ट पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा. 5 मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

मध आणि हळद

काही व्यक्तींची त्वचा फार कोरडी असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी मध, हळद आणि त्यात थोडं तूप टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्याने पिंपल्सच्या समस्येपासून तुमची सुटका होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com