Pigeon Prevention : खिडकीत, बाल्कनीत कबुतरांच्या येण्याने वैतागला आहात? या सोप्या ट्रिक वापरा, एकही कबुतर दिसणार नाही

Easy Home Remedy to Keep Pigeons Away : सीडी, सिल्व्हर फॉइल, मसाले, बर्ड स्पाईकच्या मदतीने सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही खिडकीत, बाल्कनीत येणाऱ्या कबुतरांपासुन सुटका मिळवू शकता.
Easy home remedy to keep pigeons away
Easy home remedy to keep pigeons awayGoogle
Published On

बरेचलोक त्यांच्या खिडकीत, बाल्कनीत आणि टॅरेसवर येणाऱ्या कबुतरांना अक्षरश: वैतागले आहेत. ते सगळीकडे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरवतात. शिवाय धान्य खातात त्यामुळे बाहेर वाळवणं घालणं सुद्धा कठिण होते. एका अभ्यासातून समोर आले आहे की, कबुतरांची विष्ठा आरोग्यासाठी अनेक समस्या निर्माण करते. यामुळे श्वसनाचे आजार, फुफ्फुसाचे आजार आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. यापासुन वाचण्यासाठी आणि कबुतरांना तुमच्या बाल्कनीत येण्यापासुन रोखण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता.

Easy home remedy to keep pigeons away
Pigeons Affect Lungs Health: तुमच्या घराच्या खिडकीत सतत कबुतर येतात? वेळीच सतर्क व्हा, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार

कबुतर असा पक्षी आहे ज्याला अंधाऱ्या आणि दमट वातावरण असलेल्या ठिकाणी रहायला आवडतं. त्यामुळे सर्वप्रथम बाल्कनीमध्ये उजेड आणि कोरडेपणा राहील अशी व्यवस्था करा. तुमच्या घरात एखादी जुनी सीडी म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क असेल तर ती एका दोऱ्याच्या मदतीने खिडकीत किंवा बाल्कनीत अडकवा. कबुतरांना चमकदार वस्तू आवडत नाहीत त्यामुळे ते लांब राहतील. सीडी नसेल तर त्याऐवजी तुम्ही एल्युमिनियम फॉयल वापरू शकता. एल्युमिनियम फॉयलचे काही तुकडे बाल्कनीमध्ये पसरवून ठेवा. किंवा फॉयलचे तुकडे एकत्र करून गोळा तयार करा आणि दोऱ्याच्या मदतीने तो तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीत अडकवा.

शक्य असल्यास बाल्कनीला जाळी बसवून घेऊ शकता. किंवा बर्ड स्पाइक लावा. जाळी लावल्याने कबूतर आत येऊ शकणार नाहीत. तसेच स्पाइकमुळे कबुतरांना तिथे बसणे व घरटे बांधणे कठिण होईल. शिवाय कबुतरांना मसाल्यांचा तीव्र वास सहन होत नाही. यासाठी तुम्ही बाल्कनीत किंवा खिडकीमध्ये लाल तिखट, काळी मिरी किंवा दालचीनी यासारखे तीव्र वासाचे मसाले एका वाटीत भरून ठेवू शकता.

Easy home remedy to keep pigeons away
Pigon Virus: 'कबूतर' व्हायरस घेईल जीव? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

तुम्ही तुमच्या बाल्कनीत विंड चाइम्स लावू शकता. यामुळे बाल्कनीची शोभाही वाढेल आणि कबुतरांपासुन सुटका देखील मिळेल. विंड चाइम्सचा मंद किणकिण आवाज आपल्यासाठी शांतता देणारा असला तरी कबुतर या आवाजाला घाबरतात. याशिवाय मसाल्यांप्रमाणे असे काही तीव्र वासाचे इसेन्शियल तेल आहेत ज्यांच्या वासाने कबुतर लांब पळतात. यासाठी यूकेलिप्टस, टी ट्री, पेपरमेंट यांसारख्या तीव्र वासाच्या तेलांचे काही थेंब पाण्यात मिसळा. आणि एका स्प्रे बॉटलच्या मदतीने ते पाणी कबुतर येण्याच्या ठिकाणी स्प्रे करा.

Easy home remedy to keep pigeons away
Kabutarkhana: मुंबईत चार ठिकाणी तब्बल १०००० कबुतरे; इमारतीचं नुकसान, आरोग्यावर परिणाम, अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com