Child Care Tips : पालकांनो, मुलांच्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका; अन्यथा...

प्रत्येक पालक मुलांची काळजी घेतात.
Child Care Tips
Child Care TipsSaam Tv
Published On

Child Care Tips : प्रत्येक पालक मुलांची काळजी घेतात, पण कधी कधी असे घडते की त्यांच्या खाण्यापिण्याकडे, अभ्यासाकडे लक्ष देताना आपण अनेक छोट्या-छोट्या गोष्टी विसरतो. खरंतर या गोष्टी त्यांच्या आरोग्याशी निगडीत असतात. मौखिक आरोग्य हा देखील असाच एक विषय आहे, जो मुलांच्या अति आरोग्याशी संबंधित आहे.प्रत्येक पालकाला याची माहिती असली पाहिजे आणि मुलांच्या (Child) तोंडी आरोग्याची (Health) काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे. या प्रकरणात, आपण काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

Child Care Tips
Introvert Child : तुमचे मुलं अंतर्मुख आहे का? 'ही' लक्षणे दिसत असतील तर, वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सकाळी उठल्याबरोबर ब्रश करणे -

तुमच्या मुलांना शिकवा की त्यांनी उठल्यानंतर फ्रेश असणे आवश्यक आहे आणि ब्रश करणे खूप महत्वाचे आहे. मुलांना ब्रश केल्याशिवाय काहीही खायला देऊ नका. ब्रश न करता अन्न खाणे त्यांच्या तोंडाच्या आरोग्यासाठी वाईट आहे.

रात्री ब्रश करुन झोपायला लावणे -

सकाळी उठल्यावर ब्रश करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय तुमच्या मुलांनी रात्रीचे जेवण झाल्यावर ब्रश करून झोपाणे आवश्यक आहे. यामुळे मुलांचे मौखिक आरोग्य चांगले राहते आणि त्यांचे दातही मजबूत राहतील.

Child Care Tips
Child Heart Problem : व्हिडीओ गेम्सच्या अतिवापरामुळे मुलांच्या हृदयावर होऊ शकतो परिणाम ! संधोनातून धक्कादायक खुलास

मुलांना जास्त पाणी द्या -

प्रौढांप्रमाणेच मुलांनीही पाणी पिणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे मुलांना पाणी पिण्याची सवय लावा.पाणी प्यायल्याने मुलांची पचनशक्ती सुधारते.पोट बरोबर राहिल्याने मुलांचे तोंडाचे आरोग्यही चांगले राहील.

चॉकलेट आणि साखरेचा कमी वापर -

मुलांना अशा गोष्टी खाऊ देऊ नका, ज्यामुळे त्यांचे तोंडाचे आरोग्य बिघडते.चॉकलेट, साखर, कँडी वर्ज्य करण्यास सांगा.मुलांना जास्त तळलेले अन्न देऊ नये.यामुळे लहान मुलांच्या दातांचे नुकसान होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com