Parenting Tips : पालकांच्या 'या' 6 चुका मुलांवर पडू शकतात भारी, यामुळे मुले बिघडूही शकतात

मुलांना वाढवणे व त्यांना चांगल्या वाईटाची समज देणे हे बऱ्याच पालकांना जमत नाही.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv

Parenting Tips : असे म्हणतात की प्रत्येकाचे संगोपन वेगळे असते आणि तुम्ही दुसऱ्याच्या संगोपनाची स्वतःशी तुलना करू शकत नाही. मुलांना वाढवणे व त्यांना चांगल्या वाईटाची समज देणे हे बऱ्याच पालकांना जमत नाही.

हल्ली मुले शाळेत किंवा इतर काही ठिकाणाहून चुकीच्या गोष्टी शिकून येतात ज्यावर पालक सर्रास नजरअंदाज करतात. पण, पालकांच्या काही सवयी अशा असतात ज्या मुलांसाठी चांगल्या ठरत नाहीत.

या सवयींमुळे मुलांच्या सवयी, वागणूक आणि बोलण्याची पद्धतही बदलते. मुले हट्टी किंवा आक्रमक बनू शकतात. म्हणूनच पालकांनी मुलांसमोर काही काम करणे टाळले पाहिजे, तसेच मुलांचे वर्तन बिघडणार नाही, यासाठी त्यांच्या वागण्यात बदल आणि सुधारणा करणे आवश्यक आहे. (Parenting Tips Information In Marathi)

Parenting Tips
Parenting Tips : सोशल मीडियामुळे 'या' वयातील मुलांच्या मानिसकेतवर परिणाम, पालकांनी वेळीच द्यावे लक्ष !

पालकांच्या सवयी ज्या मुलांसाठी वाईट ठरतात

1.आपल्या मतावरुन फिरणे

पालक जेव्हा मुलांना काही नवीन शिकवतात किंवा नैतिकतेचे धडे देत असतात, तेव्हा त्या गोष्टी त्यांच्या सवयींमध्ये साचेबद्ध करणेही आवश्यक असते. तुम्ही प्रत्येक दिवशी तुमचे शब्द उलट करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही मुलांना मोठ्यांचा आदर करा असे सांगितले तर तुम्ही मुलांचा आणि तुमच्या मोठ्यांचाही आदर केला पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांना स्वतःच्या पालकांचा अपमान करून स्वतःचा आदर करायला शिकवू शकत नाही.

2. मुलांना शांत करण्यासाठी इतर गोष्टी देणे

मुलांना एखाद्या गोष्टीची समस्या असल्यास, त्यांनी प्रश्न विचारला, कोणाची तक्रार केली किंवा वेळोवेळी काही कारणाने रडायला सुरुवात केली, तर एक पालक (Parents) म्हणून तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांची समस्या समजून घेणे आवश्यक आहे. गोष्टी मिळवून मुलांना काही काळ आनंदी करणे हा समस्येवरचा उपाय नाही. यामुळे मुले हट्टी होतात.

Parenting Tips
Parenting Tips : तुमची मुलं खरं बोलताय की, खोटं ? या ट्रिक्सने ओळखा त्यांच्या मनातलं

3. मटीरियलिस्टिक असणे

पालक मटीरियलिस्टिक असतील तर मुलांनाही ही सवय लागते. याशिवाय मुलांना आवश्यकतेपेक्षा जास्त महागड्या वस्तू दिल्याने ते मटीरियलिस्टिक बनतात. उदाहरणार्थ, शाळेत महागडी पेन्सिल घेऊन जाताना, मुलांना (Child) सामान्य पेन्सिल असलेल्या मुलांपेक्षा कमीपणा वाटू लागतो.

4. सतत ओरडणे

मुलांबद्दलच्या एखाद्या गोष्टीवर तुमची पहिली प्रतिक्रिया ओरडण्याची असेल, तर मुले तुमच्यापासून सर्वात जास्त घाबरतील किंवा दूर जाऊ लागतील. ते त्यांच्या मनातलं तुमच्याशी बोलण्यास टाळाटाळ करतील आणि तुमची चूक झाली असेल तर ते कळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.

5. भांडण करणे

अनेक वेळा पालक भांडू लागतात आणि मुलाच्या चुकींवर एकमेकांना दोष देतात. यामुळे मूल स्वतःच आपली चूक मान्य करू लागते आणि ही सवय आयुष्यभर त्याच्यासोबत राहते.

6. मुलांवर हसणे

बालपण असे असते की ज्यात मुले खेळतात, उडी मारतात आणि पडतात. पण, जर पालक मुलांकडे हसायला लागले, तेही त्यांच्या प्रत्येक हालचालीवर किंवा बोलण्यात, तर मुले थरथर कापू लागतात. अशा गोष्टींमुळे मुलंही आत्मस्वरूपी किंवा स्वत:मध्ये जगतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com