Pan Side Effects : चवीचवीने खाताय विड्याचे पान, आधी तोटे तर जाणून घ्या

पानाची चव चांगली लागते म्हणून लोकांना पान खाणे आवडते
Pan Side Effects
Pan Side EffectsSaam Tv
Published On

Pan Side Effects : आपल्याकडे पान मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे पान मिळते लोक त्यांच्या आवडीनुसार पान खाने पसंत करतात. जेवणानंतर पान खाण्याची सवय असते. पानाची चव चांगली लागते म्हणून लोकांना पान खाणे आवडते

पण तुम्हाला माहिती आहे का? याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. ग्लुकोजचे लेव्हल नियंत्रित ठेवण्याचे काम करते तसेच कोलेस्ट्रोलची पातळी कमी करते आणि हृदय निरोगी राहते.

Pan Side Effects
Vitamin C Side Effects : जास्त प्रमाणात 'जीवनसत्त्व क' चे सेवन ठरु शकते आरोग्याला हानिकारक !

सुपारीच्या पानात अनेक गुणधर्म असतात यात अँटी-कार्सिनोजेनिक आणि अँटी-म्युटेजेनिक ही संयुगे असतात जे कॅन्सर होण्यापासून तुमचा बचाव करतात. बॅक्टेरिया पासून संरक्षण करण्यासाठी सुपारीच्या पानातील अँटी-मायक्रोबियल हे गुणधर्म मदत करते. या पानाचे सेवन केल्याने जखमा लवकर भरतात.

मलेरियापासून वाचण्यासाठी पानाचा उपयोग करू शकता. बरेच लोक तोंडाचा वास येऊ नये म्हणून पान खातात एवढेच नाही तर अस्थमा बरा करण्यासाठी सुपारी पान खाल्ले जाते. बॅक्टेरियाच्या संसर्ग होण्यापासून बचाव करण्याचे काम करते.

Pan Side Effects
Pan Side Effectscanva

सुपारीच्या पानांमध्ये असणारे पोषक तत्त्व

सुपारीच्या पानात एक नाही तर अनेक पोषक तत्वे असतात ज्यामुळे तुम्ही नेहमी निरोगी राहू शकता. व्हिटॅमिन (Vitamins),मायक्रोग्रम, पोटॅशियम, निकोटेनिक एसिड हे पोषक तत्वे आरोग्यासाठी फायद्याच्या असतात. 1.3 ग्रॅम मायक्रोग्राम आयोडीन १०० ग्रॅम सुपारीच्या पानांमध्ये असते.

पान खाण्याचे काही तोटे

  • बरेच लोक सुपारीच्या पानात तंबाखू टाकून खातात त्यामुळे त्यांना तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. सुपारीच्या पानांमध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे तुम्हाला दुसरा कोणताही त्रास होत नाही.

  • खूप लोकांना पानाची एलर्जी असते. त्यामुळे पहिल्यांदा पान खाताना काळजी घ्यावी.

  • तंबाखूचे व्यसन खूप जणांना असते त्यामुळे तुम्ही जर पानांमध्ये तंबाखू मिसळून खात असाल तर तुम्हाला याचे व्यसन लागू शकते.

  • कोणत्याही प्रकारचा आजार (Disease) झाला किंवा आरोग्याला समस्या झाल्या तर डॉक्टरांना दाखवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com