Palmistry: हाताच्या 'या' रेषा देतील करियरबाबत माहिती; पाहा तुमच्या हाताच्या रेषा काय सांगतात?

Palmistry: प्रत्येक व्यक्तीच्या हातात वेगवेगळ्या रेषा आढळतात. यातील काही रेषा तुम्हाला व्यक्तीच्या करिअरशी किंवा इतर गोष्टींची माहिती देतात.
Palmistry
Palmistrysaam tv
Published On

भारतात ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, हस्तरेखाशास्त्राला देखील महत्त्व आहे. यामध्ये व्यक्तीच्या हातांवरील रेखा पाहून त्यांच्या भविष्याबाबत माहिती देण्यात येते. व्यक्तीच्या तळहातामध्ये अनेक प्रकारच्या रेषा असतात. हस्तरेखाशास्त्रानुसार हाताच्या काही रेषा व्यक्तीच्या करिअरशी निगडित शक्यता आणि आव्हानांबाबत आपल्याला माहिती देतात.

करिअरमध्ये यशाची चिन्हे

उंचावलेला गुरु पर्वत

हस्तरेखाशास्त्रानुसार, तर्जनीच्या बोटाखाली असलेल्या गुरु पर्वताचा उदय शुभ मानला जातो. यावेळी अशा लोकांना सरकारी नोकरी, शिक्षण, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रात यश मिळतं, असं मानलं जातं.

Palmistry
Grah Gochar: आज ग्रहांच्या स्थितीत होणार मोठी हालचाल; 'या' राशींसाठी सुखाचे दरवाजे उघडणार

स्वच्छ आणि लांब सूर्यरेषा

ज्या लोकांची सूर्यरेषा स्पष्ट आणि लांब असते, त्यांना करिअरमध्ये यश मिळतं.

या व्यक्तींना होतो त्रास

शॉर्ट सन लाईन

ज्या व्यक्तींच्या हातात अतिशय लहान सूर्यरेषा असते आणि हृदय रेषेच्या आधी संपते त्यांना करिअरमध्ये बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो. शास्त्रानुसार, असं मानलं जातं की, या व्यक्तींना मनाप्रमाणे नोकरी मिळते.

छेद असलेल्या रेषा

हस्तरेखाशास्त्रानुसार सूर्यपर्वतावर जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर तीन-चार रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्यांच्या करियरमध्ये चांगली कामगिरी होत नाही. त्यांना यावेळी अनेक संकंटांचा सामना करिअरमध्ये मिळणं अवघड असतं.

Palmistry
Shani Nakshatra Gochar: शनीदेव करणार नक्षत्रामध्ये गोचर; 'या' राशींचं नशीब चमकणार, कमाईही तगडी होणार

अस्पष्ट सूर्य रेषा

ज्या लोकांच्या तळहातावर स्पष्ट सूर्यरेषा नसते त्यांना करियरसंबंधी काही समस्या येऊ शकतात. यावेळी लोकांना करिअरशी संबंधित निर्णय घेताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. या लोकांना करिअरमध्ये चढ-उतारांना सामोरं जावं लागतं.

Palmistry
Friday Horoscope: गुरुवारचा दिवशी 'या' ४ राशींना मिळणार नशीबाची साथ; पाहा काय काय फायदे होणार?

(Disclaimer - या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. हे स्वीकारण्यापूर्वी, संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला नक्कीच घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com