मुंबई : कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुला-मुलींमध्ये या वयात फॅशनचे क्रेझ अधिक असते. त्यांना ट्रेंडनुसार (Trend) कपड्यांची फॅशन करायला आवडते. पण हा ट्रेंड काही दिवसांपूरता असतो.
हे देखील पहा -
कॉलेजला जाणाऱ्या मुलांना आपले कपाट सेट करणे खरं तर कंटाळवाणे असते. रोज एकसारखी स्टाइल आपण कॉलेजमध्ये करु शकत नाही. त्यासाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये काही फॅशन पीस असायला हवे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला दररोज नवीन लुकसाठी वेगळ्या फॅशन (Fashion) पीसवर पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसते. इतकंच नाही तर त्याचा लुक सगळ्यांना प्रभावित करतो. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही फॅशन आउटफिट्सबद्दल सांगत आहोत, जे प्रत्येक कॉलेज जाणाऱ्या मुलीच्या वॉर्डरोबमध्ये असले पाहिजेत-
१. रिप्ड जीन्स हा असाच एक डेनिम वेअर आहे जो आपल्या लूकमध्ये वेगळेपणा आणतो. कॅज्युअलमध्ये स्टायलिश लूकसाठी रिप्ड जीन्स सहजपणे स्टाईल करता येते. आपण ते प्लेनपासून प्रिंटेड टी-शर्टपर्यंत सर्व गोष्टींसोबत कॅरी करू शकता. त्याच वेळी, आपण हे टँक टॉप ते ऑफ शोल्डर टॉपसह घालू शकतो. तसेच त्यावर जॅकेट देखील आपण घालू शकतो.
२. उन्हाळ्यात आपल्या अधिक गरम होते त्यासाठी कोणता लूक कॅरी करावा आपल्याला हे कळत नाही. अशावेळी आपण धोती पँट स्टाइल करणे योग्य ठरेल. स्कार्फसोबत शॉर्ट एथनिक टॉप असलेली धोती पॅन्ट कॅरी करू शकतो. तसेच स्कार्फऐवजी आपण त्यावर जॅकेट घालू शकतो. त्याचबरोबर धोती पँट कुर्तीसोबत तितकीच चांगली दिसते. धोती पँटमध्ये आपला लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही मोजादी आणि मिरर वर्क बॅगसह ऍक्सेसरीझ करू शकता.
३. तसेच आपण आपल्या कपाटात स्कर्टला स्थान देऊ शकतो. प्लेन टॉप ते टी-शर्ट क्रॉप टॉप इत्यादींसह लांब स्कर्ट छान दिसतात. कॉलेजमध्ये स्टेटमेंट लूकसाठी आपण त्यांना कॅरी करु शकतो. तसेच लांब नेकपीस किंवा चांदबलीसारख्या अॅक्सेसरीजसह स्टाइल करण्याचा प्रयत्न करा.
४. जर आपल्या स्टायलिश लूक करायला आवडत असेल तर आपण कॉलेज लूकमध्ये क्रॉप टॉप स्टाइल करू शकतो. क्रॉप टॉप फक्त जीन्ससह स्टाइल केले जात होते, परंतु आता आपण आपल्या लूकमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी पलाझोच्या लांब स्कर्टसोबत घालू शकतो.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.