
Wireless Earbuds : Oraimo ने आपले नवीन इयरबड्स oraimo FreePods 4 भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. कंपनीच्या मते, oraimo FreePods 4 हे खास त्यांच्यासाठी डिझाइन केले गेले आहे ज्यांना प्रीमियम लुकसह दर्जेदार आवाज आहे.
1. वैशिष्ट्ये (Specification)
प्रिमिअम वायरलेस इअरबड्समध्ये आधुनिक एएनसी तंत्रज्ञान आहे, जे जवळपास ३० डेसिमल आवाज कमी करू शकते. तसेच, यामध्ये 4-माइक प्रोप्रायटरी बीमफॉर्मिंग अॅरे आणि एआय डीप न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम आहे, जे कॉल्सदरम्यान अचूकपणे इतर आवाज ओळखू शकते व कमी-जास्त करू शकते.
डिवाईसमधील नवीन ट्रान्सपरन्सी मोड श्रोत्यांना इअरबड्स न काढता आसपासच्या वातावरणाशी पुन्हा कनेक्ट होण्याची स्थिर करते. यामध्ये लो-लेटन्सी गेमिंग मोड आहे, जो ऑडिओमध्ये तयार होणारा त्रास कमी करतो आणि एकसंधी कनेक्टीव्हीटीची खात्री देतो. डिवाईस स्लाइड-टू-ओपन वैशिष्ट्यासह येतात, तर अॅण्टी-ड्रॉप मॅग्नेट्स काहीसे हलले तरी पॉड्सना कानांमध्ये सुरक्षितपणे घट्ट ठेवतात.
2. बॅटरी
फास्ट-चार्जिंग तंत्रज्ञानाव्यतिरिक्त फ्रीपॉड्समध्ये जवळपास ३५.५ तासांचे म्युझिक ऐकण्याचा आनंद घेता येईल. १० मिनिटांच्या क्विक चार्जमध्ये बॅटरी जवळपास १७० मिनिटांपर्यंत कार्यरत राहू शकते.
3. नवीन ओरायमो साऊंड अॅप
अद्वितीय साऊंड क्वालिटीसह फ्रीपॉड्स-4 ऑडिओफाइल्स व संगीतप्रेमींना त्यांच्या विशिष्ट स्टाइल्स तयार करण्याकरिता टूल्स देतात. यामध्ये ओरायमो साऊंड अॅपवर एकसंधीपणे ऑडिओ चालू करता येऊ शकतो, जे पाच ईक्यू मोड्समधून निवड करण्याची, टच कंट्रोल्स करण्याची, नॉईस कंट्रोल मोड्सदरम्यान बदल करण्याची आणि फाइण्ड माय डिवाईस वैशिष्ट्यासह इअरबड्स हरवले असल्यास शोधण्याची सुविधा देतात.
4. कनेक्टीव्हीटी
ब्लूटूथला गुगल फास्ट पेअरिंगच्या माध्यमातून काही सेकंदांत कनेक्ट करता येऊ शकते. या इअरबड्सना अत्यंत सेन्सिटिव्ह सेन्सरसह येतात, जो केलेल्या विनंत्यांना अचूकपणे प्रतिक्रिया देतो, ज्यामुळे प्रेस किंवा क्विक टचसह लगेच गाणी बदलू शकतात, कॉल्सना उत्तर देऊ शकतात आणि व्हॉल्यूम लेव्हल्सही ठेवू शकतात.
5. सुरक्षितता
फ्रीपॉड्स-4 आयपीएक्स-5 स्प्लॅशप्रूफ आहे आणि त्यामध्ये स्वेट प्रोटेक्शन आहे, जे पाण्यापासून संरक्षण करु शकते. तसेच, हे उत्पादन अॅण्टीबॅक्टेरिअल इअर टिप्ससह येते. ज्यामुळे जीवाणू व बुरशीजन्य संसर्गांचा धोका कमी होतो.
6. किंमत व उपलब्धता
फ्रीपॉड्स 4 ची किंमत १,९९९ रूपये आहे आणि ८ जूनपासून फक्त फ्लिपकार्टवर १,५९९ रूपये या लाँच किंमतीत उपलब्ध असेल. तरूण वापरकर्त्यांच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये अधिक भर करत स्टायलिश फ्रीपॉड्स 4 आरामदायीपणा, स्लाइड, सर्वोत्तम शांतमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी वेअर अॅण्ड प्ले याबाबत तडजोड न करता उच्च दर्जाच्या साऊंडचा शोध घेणाऱ्यांसाठी योग्य टीडब्ल्यूएस आहे.
ओरायमो इंडियाचे बीयू हेड सचिन कपूर म्हणाले की, आम्हाला भारतीय बाजारपेठेत फ्रीपॉड्स ४ सादर करण्याचा आनंद होत आहे. आम्ही किफायतशीर किंमतीमध्ये सर्वोत्तम व नॉईज-फ्री कॉलिंग अनुभव देण्यासाठी त्यामध्ये प्रगत एएनसी तंत्रज्ञान देखील समाविष्ट केले आहे. विश्वास आहे की, फ्रीपॉड्स4 तरूण भारतीयांना त्यांच्या आवडत्या ऑडिओ कन्टेन्टमध्ये सामावून जाण्यास सक्षम करत त्यांचे लक्ष वेधून घेईल, अधिक माहितीसाठी कृपया https://in.oraimo.com/ ला भेट देऊ शकता
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.