स्किझोफ्रेनिया हा आजार गंभीर स्वरुपाचा असून यात भास किंवा भ्रम आपल्याला होऊ लागतात. या आजाराची सुरुवात खरेतर तारुण्यातच सुरु होते.
हे देखील पहा -
आकार बदलत जाणाऱ्या ऑप्टिकल इल्युजनकडे पाहाणे हा एक चांगला अनुभव आहे. परंतु, यापैकी एखादी अमूर्त, गोंधळात टाकणारी प्रतिमा खरोखरच स्किझोफ्रेनिया शोधू शकते तर काय? स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना पोकळ मुखवटा म्हणून ओळखल्या जाणार्या ऑप्टिकल इल्युजनने फसवले जात नाही, याला आपल्यापैकी बाकीचे लोक बळी पडू शकतात.
क्रॉनिक डिसऑर्डरची काही सामान्य लक्षणे म्हणजे भ्रम आणि गोंधळ. तसेच, स्किझोफ्रेनिया असलेल्या लोकांना जेव्हा ऑप्टिकल इल्युजन होते तेव्हा वास्तविकतेचे चांगले आकलन होते.
तज्ज्ञांच्या मते, स्किझोफ्रेनियाचा अंदाज लावू शकतात अशा सोप्या मार्गांपैकी एक म्हणजे पोकळ मास्क इल्युजनचा समावेश असलेल्या व्हिज्युअल चाचणीद्वारे करणे.
आतला मुखवटा (Mask) दाखवल्यावर, या इल्युजनमध्ये आपल्याला अंतर्गोल चेहरा व सामान्य बहिर्वक्र चेहरा दिसून येतो. भ्रम दृश्य जगाचा अर्थ लावण्यासाठी आपल्या मेंदूच्या धोरणाचा फायदा घेतो. चेहरा कसा दिसायला हवा ही त्यांची कल्पना वास्तवावर अवलंबून असते. यात काही स्किझोफ्रेनिक रुग्णांना पोकळ मुखवटा दिसण्याची शक्यता असते. स्किझोफ्रेनियाचे रुग्ण या मुखवट्यातून अचूकपणे पाहू शकतात. कदाचित त्यांचा डोळ्यांना (Eye) जे दिसते ते मेंदूला कळते आहे असे जर्नल NeuroImage मध्ये २००९ साली सांगितले. त्याचे निष्कर्ष नॉन-स्किझोफ्रेनिक आणि स्किझोफ्रेनिक लोकांद्वारे भ्रम समजण्याच्या पद्धतीमध्ये एक उल्लेखनीय फरक दर्शविला. तसेच १६ लोकांना ९९% पोकळ मुखवटे हे बहिर्गोल मुखवटे समजले, तर स्किझोफ्रेनिया असलेल्या १३ लोकांनी केवळ ६% वेळा बहिर्गोल मुखवटा पाहिल्याचे नोंदवले.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.