
सॅमसंग आणि मोटोरोलानंतर काही महिन्यांपूर्वी ओप्पोने फोल्डेबल फोन लॉन्च करणारी तिसरी कंपनी बनली आहे. अशातच या फोनची भारतात धमाकेदार एंट्री होणार आहे.
OPPO आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याचे ठरवले आहे. कंपनीने Oppo Find N3 Flip टीझर लॉन्च केला आहे. चीनी स्मार्टफोन निर्मात्याने यापूर्वी ट्विटवर Oppo Find N3 फ्लिपचा टीझर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Oppo Find N3 Flip मध्ये 1080x2520 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. यामध्ये AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश दर देते. या फ्लिप फोन 382x720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 3.26-इंचाच्या डिस्प्लेसह येतो.
स्क्रीनला स्क्रॅच येऊ नये यासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसच्या मदतीने बनवण्यात आली आहे. यामध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 9200 चिपसेट आहे. हा फोन 12GB रॅमसह 256GB आणि 512GB स्टोरेजमध्ये येतो. या स्मार्टफोनमध्ये Android 13 ऑपरेटिंग सिस्टम आहे.
या फोनमध्ये Hasselblad द्वारे समर्थित ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. मागच्या साइडच्या कॅमेरामध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP प्राथमिक कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 48MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि f/2.0 अपर्चरसह 32MP टेलिफोटो लेन्स समाविष्ट आहेत. समोर 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
हा फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा आहे. यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,300 mAh बॅटरीने दिली आहे. ओप्पोचा हा फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, स्टिरिओ स्पीकर, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 5G सपोर्टसह येतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.