Crossword Puzzle : मेंदूला थोडासा ताण द्या, ऑनलाईन सोडवा शब्दकोडे

Online Crossword Puzzle :ऑनलाईन शब्दकोडे लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे या पर्यांयांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात.
Crossword Puzzle
Crossword PuzzleSaam tv
Published On

Crossword Puzzle :

डिजिटल युगात अनेक परंपरागत चालत आलेल्या गोष्टी बदलल्या आहेत. वृत्तपत्रेदेखील डिजिटल झाली आहे. यासोबत वृत्तपत्रांमध्ये येणारी शब्दकोडी देखील आता डिजिटल रुपात आली आहे. अनेकांच्या शब्दकोडे सोडवण्याची आवड असते. शब्दकोडी सोडवण्याची ही हौस आता त्यांना ऑनलाईन भागवता येणार आहे.

शब्दकोड्यांचे फायदे देखील अनेक आहे. विचार करण्याची क्षमता वाढते, मेंदूला चालना मिळते, स्मरणशक्तीही वाढते. त्यामुळे मनोजरंजन वाटणारा हा खेळ तितकाच फायदेशीर आहे.

शब्दकोड्यांचे पर्याय

ऑनलाईन शब्दकोडे लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे या पर्यांयांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात. तसेच शब्दकोडी विविध प्रकारची असणार आहे.

यामध्ये सर्वसमावेशक, मजेशीर, शब्दकोश, सामन्य ज्ञान, मराठी-इंग्रजी, इंग्रज-मराठी, स्पर्धा परीक्षा, घोटाळे ओळखा? असे तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता.

अशी रितीने अनेकांना एका वेगळ्या रुपात आपला छंद जपता येणार आहे. यामुळे मेंदूचा व्यायामही होणार आहे. ऑनलाईन शब्दकोडे सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://crosswordhouse.com/

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com