Relationship Tips : पूर्वीच्याकाळी २० ते २५ जणांचं कुटुंबं आनंदाने एकत्र कसं राहायचं? वाचा कारणे

Old Relationship : आपल्याला कुटुंबातील ४ माणसांशी पटवून घेता येत नाही तर पूर्वीच्या काळी २० ते २५ जणांचं कुटुंब एकत्र कसं राहत असेल?
Old Relationship
Relationship Tips Saam TV

सध्याच्या काळात ३ ते ४ व्यक्तींचंच कुटुंब पाहायला मिळतं. सर्वजण काम, शिक्षण या सर्व गोष्टींमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे घरामध्ये सर्वांसोबत वेळ घालवण्यासाठी फार कमी वेळ मिळतो. वेळ कमी असला तरी त्या वेळात देखील आपलं कुटुंबातील व्यक्तींशी पटत नाही. वाद होतात, मतभेद होतात. त्यामुळे अनेक तरुण मुलं-मुली एकटे देखील राहतात. आपल्याला कुटुंबातील ४ माणसांशी पटवून घेता येत नाही तर पूर्वीच्या काळी २० ते २५ जणांचं कुटुंब एकत्र कसं राहत असेल?

Old Relationship
Relationship Tips : वेळीच नाही बोलणे शिकून घ्या; आयुष्यभर आनंदी रहाल

असा प्रश्न तुमच्याही मनात अनेकदा आला असेल. पूर्वीच्या काळी प्रत्येक कुटुंबात आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकी, त्यांची मुलं असं तब्बल २० ते २५ माणसांचं कुटुंब असायचं. त्यांच्यातही वाद होत असतील. मात्र तरीही ते एकत्र राहत होते. त्याचं कारण काय हेच आज जाणून घेऊ.

मोठी माणसं समजावून सांगायची

घर म्हटल्यावर भांडण, वाद आणि कलह या सर्व गोष्टी आल्याच. पूर्वीच्याकाळी जरी दोन भावांत भांडणं झाली तरी घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्ती सारं काही समजून घेऊन भांडणं मार्गी लावायचे. परंतु आताची पिढी कोणतीही गोष्ट समजून घ्यायला तयार नसते. आधुनिक काळ, तंत्रज्ञान तसेच उच्च दर्जाचं शिक्षण असल्यामुळे आताच्या काळातील मुला-मुलींना घरातल्या माणसांशी तसेच पारिवारिक गोष्टींशी जुळवून घेण्यास आवघड जाते.

वरिष्ठांची मदत

लग्नानंतर अनेक जोडपे कौटुंबिक जबाबदारीपासून वाचण्यासाठी आई-वडिलांपासून म्हणजेच परिवारापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर दोघेही वर्किंग असल्यामुळे एखादं मूल झाल्यास त्याला सांभाळायला बेबी सेटिंगमध्ये ठेवतात. परंतू घरं सोडण्याचा निर्णय नसता घेतला तर घरातल्या हक्काच्या व्यक्तीने मुल सांभाळलं असतं. ही गोष्ट नातं तुटल्यावर आणि वेळ निघून गेल्यावर काही लोकांच्या लक्षात येते.

घटस्फोट

पूवीच्याकाळी तुमच्या आजी किंवा काही म्हतारी माणसं यांच्याकडून तुम्ही असं नक्की ऐकलं असेल की, आमच्या काळात घटस्फोट नावाची संकप्लनाच नव्हती. एकदा लग्न झालं की ते शेवटपर्यंत टिकवावं लागत होतं. मात्र आता तसं होत नाही. पती-पत्नी दोघेही सुशिक्षीत असतात. त्यामुळे त्यांना एकमेकांसाठी पैशांसाठी अॅडजेस्ट करणं जमत नाही. त्यामुळे ते वेगळे होतात. पूर्वीच्याकाळी जोडप्यात काही वाद झाले तरी मोठ्यांच्या सल्ल्याने ते सोडवले जात होते. मात्र आता विवाहीत जोडपी एकटं राहतात आणि स्वत:च स्वत:चे निर्णय घेतात.

कमी गोष्टीत आनंद शोधणे

आजकाल व्यक्तीच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की ते आपल्याजवळ असलेल्या गोष्टींमध्ये सुखी नाहीत. त्यांना कायम आहे त्यापेक्षा आणखी चांगल्या गोष्टी हव्या असतात. मन संतुष्ट नसते. मात्र पूर्वीच्याकाळी असं नव्हतं. पूर्वीची माणसं आपल्याकडे आहे त्या गोष्टींमध्ये आनंदी आणि सुखी राहायचे. जास्त सुखाच्या मागे धावत नव्हते. त्यामुळे पैसे आणि मौज-मजा कमी असली तरी व्यक्ती जे आहे त्यात आनंद शोधत होते.

Old Relationship
Relationship Tips : डेट करणाऱ्या मुलीशी चॅटवर बोलताना 'ही' काळजी घ्या; प्रेमाचं नातं आणखी बहरेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com