देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिक या वर्षातील सर्वात जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. कंपनी 3 डिसेंबरपासून 'डिसेंबर टू रिमेंबर' मोहीम सुरू करत आहे. यात कंपनी S1 X+ इलेक्ट्रिक स्कूटरवर 20 हजार रुपयांची सूट देत आहे. त्यानंतर याची किंमत 89,999 रुपये झाली आहे. यापूर्वी या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,09,999 रुपये होती. ही ऑफर मर्यादित काळासाठी वैध असेल.
Ola आपल्या S1 X+ मध्ये हाय-क्वॉलिटी परफॉर्मन्स, अॅडव्हान्स टेक फीचर्स आणि चांगली रायडींग क्वालिटी ऑफर करते. ही 3kWh बॅटरीने सुसज्ज आहे. जी एका चार्जवर 151Km ची रेंज देते. यात 6kW ची मोटर आहे, जी 3.3 सेकंदात 0-40 किमी प्रति तास वेग पकडते. याचा टॉप स्पीड 90Km/h आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याबाबत माहिती देताना कंपनीचे मार्केटिंग अधिकारी अंशुल खंडेलवाल म्हणाले की, ओला इलेक्ट्रिकने नोव्हेंबरमध्ये 30,000 युनिट्सच्या विक्रमी विक्रीसह एक नवीन बेंचमार्क तयार केला आहे. आज आम्ही विक्रीच्या बाबतीत S1 X+ सह ICE स्कूटरच्या जवळ आलो आहोत. आम्हाला खात्री आहे की, S1 X+ #EndICEAge साठी तयार आहे. (Latest Marathi News)
निवडक क्रेडिट कार्ड्स EMI वर 5,000 रुपयांच्या सूटचा देखील ग्राहकांना फायदा होईल. इतर ऑफरमुळे, ग्राहकांना शून्य डाउन पेमेंट, शून्य प्रक्रिया शुल्क आणि 6.99 टक्के इतके कमी व्याजदराचा लाभ देखील मिळेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ही 2,099 रुपयांच्या मासिक EMI वर देखील खरेदी केली जाऊ शकते.
ओलाने नोव्हेंबरमध्ये केली 30,000 युनिट्सची विक्री
ओला इलेक्ट्रिक पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ठरली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2023 मध्ये कंपनीने 30,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात ओलाच्या 30 हजार इलेक्ट्रिक स्कूटरची नोंदणी झाली होती. अशा प्रकारे ओलाला मासिक आधारावर 30 टक्के वाढ मिळाली. सणासुदीच्या हंगामामुळे गेल्या महिन्यात कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीला गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या म्हणजेच ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत 82 टक्के वाढ मिळाली आहे. एवढेच नाही तर नोव्हेंबरमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 35 टक्के होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.