
अगदी थोड्याच महिला असतील ज्या लिपस्टिकपासून दूर राहतात. आजकाल तर लहान मुलींपासून कॉलेज युवतींपर्यंत प्रत्येकाकडे लिपस्टिकचा चांगला संग्रह असतो. लिपस्टिक लावल्याने चेहऱ्याचा लूक अधिक उठून दिसतो. मात्र, ती टिकवणे हे खरे आव्हान असते. लिपस्टिक लावणे सोपे असले तरी ती दीर्घकाळ टिकावी, यासाठी काही खास उपाय गरजेचे आहेत.
अनेक महिला सतत याची तक्रार करतात की त्यांची लिपस्टिक काही वेळातच निघून जाते. हे लक्षात घेता, काही सोप्या आणि उपयुक्त टिप्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. या ट्रिक्स वापरून तुम्ही अगदी सामान्य आणि स्वस्त लिपस्टिकही अनेक तास टिकवू शकता, आणि संपूर्ण दिवस तुमचा मेकअप लूक परफेक्ट ठेवू शकता.
प्रथम ओठांना स्क्रब करा
फक्त चेहरा नाही तर ओठांवरची मृत त्वचाही वेळेवर काढणं गरजेचं आहे. कारण ओठांवर डेड स्किन असेल तर लिपस्टिक व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे आठवड्यातून तीन वेळा साखर आणि मधाचं मिश्रण लावून हलक्याने मसाज करा आणि मऊ ब्रशने ओठ स्वच्छ करा.
लिप बाम लावा
कोरड्या ओठांवर लिपस्टिक टिकणं कठीण असतं. त्यामुळे लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम लावणं आवश्यक आहे. हे ओठ मऊ ठेवतं. मात्र, खूप बाम लावल्यास लिपस्टिक जास्त चमकदार दिसू शकते, त्यामुळे टिश्यूने हलक्याने अतिरिक्त बाम पुसून टाका, जेणेकरून लुक नैसर्गिक राहील.
लिप प्राइमर किंवा कन्सीलर वापरा
आजकाल बाजारात फेस प्राइमरसारखेच लिप प्राइमरही मिळतात, जे लिपस्टिक लावण्याआधी वापरल्यास लिपस्टिक दीर्घकाळ टिकते. याशिवाय, लिपस्टिकचा रंग अधिक उठावदार दिसावा म्हणून ओठांवर थोडासा कन्सीलर लावू शकता. हे दोन्ही उपाय लिपस्टिक टिकवणारे आणि लूक वाढवणारे ठरतात.
डबल कोट लावा
डबल कोट लिपस्टिक लावल्यास ती दीर्घकाळ टिकते. पहिला थर लावून टिश्यूने हलका दाब द्या, नंतर दुसरा थर लावा. त्यामुळे लिपस्टिक थोडी कोरडी होऊन जास्त काळ टिकते आणि सुंदर दिसते.
पारदर्शक पावडरने सेट करा
मेकअप सेटिंगसाठी वापरली जाणारी पारदर्शक पावडर लिपस्टिकसाठीही वापरा. ओठांवर टिश्यू ठेऊन ब्रशने पावडर लावल्याने लिपस्टिक लॉक होते आणि ती जास्त काळ टिकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.