Water Chestnut Benefits : आता औषधांची गरज नाही, कोलेस्ट्रॉल व शुगरला नियंत्रणात ठेवेल हे पीठ!

गव्हाच्या पिठापासून बनवलेले चपाती सामान्यतः आपल्या इथे खाली जाते.
Water Chestnut Benefits
Water Chestnut BenefitsSaam Tv
Published On

Water Chestnut Benefits : गव्हाच्या पिठापासून बनवलेले चपाती सामान्यतः आपल्या इथे खाली जाते. ज्वारीची भाकर, तांदळाची भाकर आणि बाजरीची भाकर खाल्ली जाते.गव्हाचे पीठ आरोग्यासाठी चांगले असते पण ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांसाठी त्यांचा ब्लड शुगर लेवल नियंत्रित राहणे गरजेचे असते.

त्यासाठी त्यांनी तांबूस पिठाच्या पाण्यात बनवलेल्या बनवलेला भाकरी खाल्ल्या पाहिजे. कार्बोहायड्रेट,प्रोटीन व्हिटॅमिन ,मॅग्नेशियम ,पोटॅशियम फायबर इत्यादी पोषक तत्त्वांनी भरपूर आहाराचा समावेश कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुमच्या इतर आरोग्य (Health) समस्या ही दूर होण्यास मदत होईल.

शिखा अग्रवाल शर्मा या पोषकतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ आणि फॅट टू स्लिम च्या संचालिका यांनी असे सांगितले आहे की, सिंघाडाच्या पिठाचा वापर तुमच्या आहारात (Diet) केल्याने हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. याचा उपयोग ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी करता येतो त्याचे इतरही फायदे आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया.

Water Chestnut Benefits
Oranges Benefits: केसांच्या आरोग्यासाठी संत्री खूप फायदेशीर, होतात चमत्कारिक फायदे

वजन नियंत्रित राहते -

सिंघाडाचा उपयोग तुमच्या आहारात केल्याने. तुमचे वजन नियंत्रित राहते. पिठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला सारखी सारखी भूक लागत नाही. तुमचे पोट खूप जास्त वेळ भरून राहते. त्यामुळे सारखे काहीतरी खाण्याचे इच्छा होत नाही आणि तुमचे वजन वाढण्याचे थांबते.

रक्तदाब नियंत्रण -

हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तदाब होय. जर त्या रुग्णांनी पोटॅशियम युक्त पदार्थ खाल्ले तर त्यांचे रक्तदाब कमी होते. पोटॅशियम सिंघाडामध्ये मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे ज्या लोकांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे. अशा लोकांनी त्यांच्या आहारात सिंघाडाच्या पिठाचा वापर केला पाहिजे.

वाईट कोलेस्ट्रॉल दूर करते -

सिंघाडामध्ये फायबरचे प्रमाण असते त्यामुळे ते रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. रक्तवाहियांमध्ये जमा झालेल्या घाणेरड्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.

तणाव दूर करणे -

व्हिटॅमिन बी 6 हे मूड बूस्टर म्हणून ओळखले जाते. आज कालच्या लोकांमध्ये तणाव खूप जास्ती वाढलेला आहे. त्यामुळे त्यांचा तणाव दूर करण्यासाठी सिंघाडाचा वापर त्यांच्या आहारात केला पाहिजे जेणेकरून त्यांना मूड फ्रेश राहील आणि तणाव दूर होण्यास मदत होईल.

Water Chestnut Benefits
Benefits Of Herbs : स्वयंपाकघरातील 'हे' 4 पदार्थ खा, सर्दी-खोकल्याला बाय बाय करा !

पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते -

सिंघाडा भरपूर प्रमाणात फायबर आहे. या पिठाची भाकर खाल्ल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. मुळव्याध, इरेटेबल बोवेल सिड्रोम आजारांचा धोका कमी करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते त्यामुळे फायबर भरपूर प्रमाणात असलेला सिंघाडा चांगला पर्याय आहे.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत -

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायबर खूप महत्त्वाचे काम करत असते. त्यामुळे सिंघाडा मध्ये फायबरचा खजिना असतो ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू देत नाही. मधुमेह रुग्णांनी याचा समावेश आपल्या आहारात करून ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आणू शकतात.

प्रतिकारशक्ती मजबूत -

प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व पोषक तत्व सिंघाडामध्ये असतात. सिंघाडामध्ये व्हिटॅमिन बी ६,फायबर, मॅग्नेशियम,पोटॅशियम इत्यादी पोषक घटक आढळतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com