आता चिंता होईल दूर; जाणून घ्या स्ट्रेस कमी करण्याचे उपाय

स्ट्रेस कमी करण्याचे उपाय
आता चिंता होईल दूर; जाणून घ्या स्ट्रेस कमी करण्याचे उपाय
आता चिंता होईल दूर; जाणून घ्या स्ट्रेस कमी करण्याचे उपायSaamTv
Published On

सध्याच्या काळात प्रत्येक जण यश, पैसा, पद, प्रतिष्ठा यांच्यामागे धावत आहे. त्यामुळे सध्याचं युग हे स्पर्धेचं युग झालं आहे असं म्हटलं जातं. परंतु, या सगळ्यांच्या मागे धावत असताना आपल्याला खरंच समाधान मिळतं का? हा प्रश्न कायम उभा राहतो. सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घालावीत असं आपल्याला वाटत असतं. त्यासाठी आपण प्रयत्नही करतो. Now the anxiety will go away; Learn how to reduce stress

मात्र, अनेकदा धावपळ, दगदग या सगळ्याचा परिणाम आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असतो. तिथूनच मग शरीरावर व मनावर ताण म्हणजे स्ट्रेस येण्यास सुरुवात होते. परंतु, हा ताण योगच्या माध्यमातून निश्चितपणे कमी करता येऊ शकतो. म्हणूनच, स्ट्रेस कमी करण्याचे उपाय कोणते ते पाहुयात.

हे देखील पहा -

स्ट्रेस कमी करण्याचे उपाय

१. झोपेची गुणवत्ता सुधारणे.

२. दररोज व्यायाम व योगासने करणे.

३. प्राणायाम व ध्यान रोज होणे आवश्यक आहे.

४. मद्यपान व धूम्रपान करू नये.

५. स्थूलता कमी करणे.

६. माफक आणि वेळच्यावेळी आहार घ्यावा.

७. पाणी भरपूर प्यावे.

८. दिवसातला काही काळ का होईना फोन, टीव्ही आणि लॅपटॉप शिवाय घालवावा.

९. निरोगी नाती व संभाषण कौशल्य टिकवावे.

१०. रोज थोडावेळ तरी निसर्गात घालवावा.

११ . कोणत्याही नवीन डाएट ट्रेन्डच्या मागे जाऊ नये.

१२. दिवसातील काही काळ तरी बाह्य विश्व सोडून स्वतः बरोबर राहावे.

आता चिंता होईल दूर; जाणून घ्या स्ट्रेस कमी करण्याचे उपाय
Daily योग: एकपाद उत्तानासन

कोणताही बदल पटकन किंवा लगेच होत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, हे बदल घडून येण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल आणि नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com