Personal Loan : कमीत कमी व्याजात मिळणार आता पर्सनल लोन, 'या' बँका देताय आकर्षक ऑफर

बँकांनी दिलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर अधिक असतो.
Personal Loan
Personal Loan Saam Tv

Personal Loan : दैनंदिन जीवनात कोणत्याही वेळी कोणत्याही कामासाठी पैशांची निकड भासते आणि अशा वेळी पैसे पूर्ण करण्याचा एकमेव सोपा मार्ग म्हणजे वैयक्तिक कर्ज. बँकांनी दिलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर अधिक असला, तरी त्याची प्रक्रिया अन्य कर्जांपेक्षा अधिक जलद व सुलभ असते. (Loan)

अनेक बँका पर्सनल लोनवर वार्षिक १३% पेक्षा जास्त व्याज आकारतात, परंतु काही बँका ९ टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने वैयक्तिक कर्ज देतात. चला जाणून घेऊयात ५ लाख रुपयांच्या पर्सनल लोनवर २५ मोठ्या बँकांचे व्याजदर आणि ५ वर्षांसाठी ईएमआय काय असेल.(Bank)

Personal Loan
Wedding Loan : मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेताय ? 'ही' कागदपत्रे अवश्य सोबत ठेवा

बँक ऑफ महाराष्ट्र -

बँक ऑफ महाराष्ट्रने पर्सनल लोनवर सर्वात कमी ८.९०% व्याज दर दिला आहे. त्यानुसार पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जावर मासिक हप्ता १० हजार ३५५ रुपये असेल. त्याचबरोबर बँक ऑफ इंडियाचा व्याजदर ९.७५% आणि ईएमआय १०५६२ रुपये असेल, पंजाब नॅशनल बँकेत हा दर ९.८०% आणि ईएमआय १०,५७४ रुपये, बँक ऑफ बडोदामध्ये १०.२५ टक्के आणि ईएमआय १०,६८५ रुपये आणि कोटक बँकेत १०.२५ टक्के आणि मासिक हप्ता १०,६८५ रुपये असेल.

इंडियन बँक -

इंडियन बँकेचा पर्सनल लोनवरील व्याजदर १०.३०% आणि ईएमआय १०,६९७ आहे. त्याचप्रमाणे फेडरल बँक १०.४९ टक्के आणि मासिक हप्ता १०,७४४ रुपये, आयडीएफसी बँक १०.४९ टक्के आणि ईएमआय १०,७४४ रुपये, इंडसइंड बँक १०.४९ टक्के आणि मासिक हप्ता १०,७४४ रुपये आणि आयसीआयसीआय बँक १०.५० टक्के आणि ईएमआय १०७४७ रुपये असेल.

Personal Loan
Education Loan : शिक्षणाची चिंता आता नको ! बॅंकेकडून मिळणार आता सहज कर्ज

पंजाब अँड सिंध बँक -

पंजाब अँड सिंध बँकेचा पर्सनल लोनवरील व्याजदर १०.५५ टक्के आणि ईएमआय १०८५९ रुपये आहे. एसबीआयमध्ये १०.६५% आणि मासिक हप्ता १०,७८४ रुपये, आयडीबीआय बँकेचा ११% व्याजासह १०८७१रुपये, एचडीएफसी बँकेचा ११% व्याजासह १०८७१ रुपये आणि युनियन बँकेचा ११.२०% दरासह १०९२१ रुपये मासिक हप्ता असेल.

सेंट्रल बँक -

सेंट्रल बँक पर्सनल लोनवर ११.७५ टक्के दराने व्याज आकारते, त्यामुळे ५ वर्षांसाठी ५ लाख कर्जांचा ईएमआय ११,०५७ रुपये असेल. त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बँकेत ११.९० टक्के व्याजासह मासिक हप्ता ११,०९७ रुपये, करूर वैश्य बँकेत ११.९५ टक्के व्याजासह ११,११० रुपये, युको बँकेत ११.९५ टक्के व्याजासह ११,११० रुपये आणि अॅक्सिस बँकेत १२ टक्के व्याजासह १११२२ रुपये असेल.

धनलक्ष्मी बँक -

धनलक्ष्मी बँक पर्सनल लोनवर 12.40% व्याज दर आकारते आणि ईएमआय 11224 रुपये येतो. साऊथ इंडियन बँकेचा ईएमआय ११,५०० रुपये असून १२.५० टक्के आणि मासिक हप्ता ११,२४९ रुपये, कॅनरा बँक १३.१५ टक्के आणि ईएमआय ११,४१५ टक्के आणि कर्नाटक बँक १३.४८ टक्के असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com