Til And Gud On Festival : फक्त मकर संक्रांतचं नाही तर, 'या' सणांमध्ये देखील तीळ आणि गुळाला आहे फार महत्व...

मकरसंक्रांती हा सण तीळ आणि गुळाशिवाय अपूर्ण आहे.
Til And Gud On Festival
Til And Gud On FestivalSaam Tv
Published On

Til And Gud On Festival : तिळगुळाचे लाडू सगळ्यांनाच माहीत आहेत. तीळ आणि गूळ या दोन पदार्थांपासून अनेक मिठाई बनवल्या जातात. पण तुम्हाला हे माहीत आहे का? की तीळगुळ हे मकरसंक्रांत सोडून आणखीन असे काही सण समारंभ आहेत ज्यामध्ये तीळ आणि गुळाशिवाय ते सण साजरीच होत नाहीत. या सणांमध्ये तीळ आणि गुळाला अधिक महत्व दिलं गेलं आहे. जाणून घेऊया, त्या सणांबद्दल

येत्या रविवारी 15 जानेवारीला मकरसंक्रांती मोठया थाटामाटात साजरी होईल. मकरसंक्रांतीच्या दिवशी सगळीकडे जल्लोष पाहायला मिळेल. अशातच निळ्या आभाळात सुंदर आणि रंगीबेरंगी पतंग पाहायला मिळतील.

ते नयनरम्य दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखे असेल. त्यातच प्रत्येक घरातून येणारा तीळगुळाच्या लाडूंचा खमंग वास फारच हवाहवसा वाटतो. मकरसंक्रांती हा सण तीळ आणि गुळाशिवाय अपूर्ण आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का आपल्या भारतात अनेक सण असे आहेत ज्यामध्ये तीळ आणि गुळाला तेवढच महत्व आहे जेवढं आपण मकर संक्रांतीला देतो.

Til And Gud On Festival
Makar Sankranti : 100 रुपयांच्या आत द्या मकर संक्रातीला 'हे' वाण !

तीळ आणि गूळ हे मकरसंक्रांतीच्या दिवशी यासाठी देखील महत्त्वाचे आहे की मकर संक्रांती हा सण थंडीच्या दिवसांत येतो आणि म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळ या पदार्थांचे सेवन करतो. थंडीच्या दिवसांत तीळ आणि गुळ आपल्या शरीरासाठी फारच फायदेशीर ठरते. तीळ आणि गूळ हे दोन्ही गरम पदार्थ आहेत आणि याचा फायदा आपल्याला थंडीच्या दिवसात आरोग्य चांगल ठेवण्यास होतो.

चला पाहूया अजून कोणते असे सण आहेत ज्यामध्ये तीळ आणि गुळाला फार महत्त्वाचे मानले जाते.

Til and gul
Til and gul canva

1. संकष्टी तीळ गणेश चतुर्थी :

संकष्टी तीळ गणेश चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पाला तीळ आणि गुळांच्या लाडूंचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी किसलेल्या तिळांचा डोंगरासारखा आकार करून गणपती बाप्पाला दुर्वा चढवली जाते.

2. षष्ठीतला एकादशी :

षष्ठीतला एकादशीचा उपवास भगवान विष्णू यांना समर्पित केला जातो. या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा करून एकादशीचा उपवास केला जातो. त्याचबरोबर भगवान विष्णू यांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो.

3. तील द्वादशी :

या सणाला भगवान विष्णू, भगवान शिव आणि नारायण यांनी सोबत पूजा केली जाते. या दिवशी तीळ आणि गुळाच्या पकवानांचा एकाच थाळीमध्ये महादेव आणि श्रीहरी यांना नैवेद्य दाखवला जातो.

4. तीलकुंद विनायक चतुर्थी :

तीलकुंद विनायक चतुर्थीला गणपतीसाठी तिळाला कुठून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. कुटलेल्या तिळासोबत गुळाचा सुद्धा नैवेद्य दाखवण्याची परंपरा तीलकुंद विनायक चतुर्थीला केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com