Get Rid of House Lizards Without Chemical
Get Rid of House Lizards Without ChemicalSaam

घरात पालींचा सुळसुळाट? फक्त १ रूपयाची 'ही' गोष्ट; मिनिटात पाली होतील गायब

Get Rid of House Lizards Without Chemicals: पालींना पळवून लावण्यासाठी तयार करा घरगुती स्प्रे. मिनिटात पाली होतील गायब. केमिकल फ्रि स्प्रे आजच घरी तयार करा.
Published on

पावसाळा असो किंवा हिवाळा घरात पाली येतात. घरातील कोपऱ्यात किंवा बल्बखाली पाली दिसतात. पालींना पळवून लावण्यासाठी बाजारात अनेक स्प्रे उपलब्ध आहेत. ज्यात केमिकलचे प्रमाण जास्त असते. या स्प्रेमुळे पाली घर सोडून जातही असतील, पण केमिकलमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. जर आपल्याला घरातून पाली पळवून लावायच्या असतील तर, घरगुती स्प्रे तयार करा.

पालींना पळवून लावण्यासाठी घरगुती स्प्रे तयार करा

लसूण आणि कांदा - पालींना लसूण आणि कांद्याचा तीव्र वास आवडत नाही.

लवंग - लंवगाच्या तिखट वासामुळे पाली पळून जातात.

Get Rid of House Lizards Without Chemical
पोलिसांकडून बलात्कार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; सातारा महिला डॉक्टर प्रकरणातील ५ मोठे खुलासे

घरगुती स्प्रे तयार कसे करावे?

सर्वात आधी, ४ ते ५ लसूण पाकळ्या आणि १ कांदा बारीक चिरून घ्या. एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात लवंग पावडर घालून मिक्स करा. आपण जास्त लवंग पावडर घालू शकता.

Get Rid of House Lizards Without Chemical
धावत्या ट्रेनमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; क्षणात सर्वत्र आगच आग, रात्री नेमकं काय घडलं?

शेवटी त्यात १ रूपयांचे छोटे शॅम्पूचे पॅकेट घाला आणि सर्वकाही चांगले मिक्स करा. त्यात थोडं पाणी घाला आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. अशा पद्धतीने घरगुती पालींना पळवून लावणारे स्प्रे तयार. पाली नियमित ज्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी स्प्रे फवारा. तसेच भीतींच्या कोपऱ्यावर, स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्येही स्प्रे फवारा. या मिश्रणाच्या तीव्र वासामुळे पाली घरातून पळ काढतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com