
नवीन वर्ष काही दिवसात येणार आहे. लोकांना वर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत खास पद्धतीने करायला आवडतं. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतात. कुठेतरी बाहेर जातात, पार्टी करतात किंवा बाहेर डिनर करतात. मात्र जे लोक घरात कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करतात ते काही खास पदार्थ तयार करतात.
अशा परिस्थितीत नववर्षानिमित्त काही खास पदार्थ बनवून घरच्याघरी कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करायचे असेल, तर असा पदार्थ निवडा जो वेगळा आणि घरातली प्रत्येक व्यक्ती खाऊन खूश होईल. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2023 रोजी लंच किंवा डिनरसाठी काही खास रेसिपी बनवा, जेणेकरून कुटुंबातील प्रत्येकजण बोटं चाटत जेवणाचा किंवा त्या पदार्थाचा आस्वाद घेतील.
नवीन वर्षाच्या निमित्ताने बनवा स्टफ्ड मशरूम रेसिपी
आपण घरी नवीन वर्षाची पार्टी आयोजित करतो. या वेळेस, जर तुम्ही मित्र किंवा नातेवाईकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले असेल, तर तुम्ही काहीतरी स्वादिष्ट बनवण्यासाठी या डिशचा वापर करू शकता. ग्रेवी सारखे पदार्थ रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात खूप चवदार आणि योग्य ठरतात. ही डिश तयार करण्यासाठी, आपण कोणत्याही भाज्यांमध्ये मशरूम मिक्स करू शकता. अशी डिश निरोगी आणि चवदार दिसेल. शिवाय बनवायलाही सोपी असेल.
ब्रेड पिझ्झाची टेस्टी रेसिपी
मुलांना पिझ्झा खूप आवडतो. यासाठी लोक अनेकदा बाजारातून पिझ्झा मागवतात. पण नवीन वर्षात घरीच पिझ्झा बनवा. बाजारातला पिझ्झा हा घरी बनवलेल्या पिझ्झ्या इतका टेस्टी आणि पौष्टीक नसतो. घरी ब्रेड पिझ्झा बनवणं सोपं आहे. ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी विविध प्रकारच्या भाज्या वापरता येतात, जेणेकरून चव आणि आरोग्य दोन्हीमध्ये कमतरता भासू नये.
विविध फ्लेवर्सचे कपकेक
कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात काहीतरी गोडाने होते. अशा परिस्थितीत नवीन वर्षाची सुरुवात गोड करा. अनेकदा लोक ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या निमित्ताने केक कापतात, पण यावेळी नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही घरी कपकेक बनवू शकता. तुम्ही बाजारातूनही कपकेक मागवू शकता पण घरी कपकेक बनवणे सोपे आहे. मुलांसाठी आणि प्रौढांसाठी अनेक फ्लेवर्समध्ये कपकेक बनवा.
Written By : Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.