Shreya Maskar
पिझ्झा बनवण्यासाठी पिझ्झा बेस, मोझेरेला चीज, तुळशीची पाने, ऑलिव्ह ऑइल इत्यादी साहित्य लागते.
पिझ्झा सॉस बनवण्यासाठी टोमॅटो, कांदा, ओरेगॅनो , केचअप, लसूण, लाल तिखट, साखर, ऑलिव्ह ऑइल, मीठ इत्यादी साहित्य लागते.
टोमॅटो सॉस बनवण्यासाठी गरम पाण्यात टोमॅटो उकडून त्याची साले काढून मिक्सरला पेस्ट करा.
एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल टाकून त्यात लसूण, कांदा, टोमॅटोची पेस्ट, ओरेगॅनो, टोमॅटो केचअप, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
शेवटी साखर घालायला विसरू नका.
पिझ्झा बनवण्यासाठी जाड क्रस्ट पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस पसरवा.
यावर चीज, तुळशीच्या पाने आणि ऑलिव्ह ऑइल पसरवा.
तयार झालेला पिझ्झा १०-१२ मिनिटे बेक करा.