Nine Colors of Navratri : नवरात्रीचे नऊ रंग; लाल, पिवळा, गुलाबी वाचा प्रत्येक दिवसाचा कलर

Significance of Nine Colors : नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी कोणता रंग आहे. या रंगाचं महत्व काय याची माहिती जाणून घेणार आहोत.
Significance of Nine Colors
Nine Colors of Navratri Saam TV
Published On

भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. येथे प्रत्येक धर्मातील विविध सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. गुजरातमध्ये नवरात्र उत्सवाला सुंदर दांडीया आणि रास गरबा खेळला जातो. तरुण मुलं-मुली एकताल धरत गरबा खेळतात. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी गरबा खेळला जातो.

नवरात्रीचे नऊ दिवस अनेक व्यक्ती उपवास करतात. देवीच्या सेवेत केलेले हे उपवास इतके कठीण असतात की काही व्यक्ती अगदी पायांत चपला देखील घालत नाहीत. या दिवसांत अनवाणी पायांनी प्रवास करतात. या नऊ दिवसांना साजरे करताना देवीला सुंदर आणि वेगवेगळ्या रंगाची साडी नेसली जाते.

देवीला ज्या रंगाची साडी नेसवली जाते त्याच रंगाची कपडे सर्व भाक्त परिधान करतात. गरबा खेण्यासाठी आल्यावर सुद्धा ज्या दिवशी जो रंग आहे तो परिधान केला जातो. तुम्ही सुद्धा सर्व रंगांनुसार कपडे परिधान करत असाल तर आज नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग आहे याची माहिती जाणून घेऊ.

Significance of Nine Colors
Shardiya Navaratri 2023 : नवरात्रीत या मंत्रांचा जप केल्याने होईल प्रत्येक समस्यांपासून मुक्ती

नवरात्रीचे नऊ रंग

३ ऑक्टोबर – पिवळा

४ ऑक्टोबर – हिरवा

५ ऑक्टोबर – करडा

६ ऑक्टोबर – भगवा

७ ऑक्टोबर – पांढरा

८ ऑक्टोबर – लाल

९ ऑक्टोबर – निळा

१० ऑक्टोबर – गुलाबी

११ ऑक्टोबर – जांभळा

१२ ऑक्टोबर – दसरा

पिवळा - पिवळा रंग ‘अष्टभुजा’ देवीचा खास आणि आवडता रंग आहे. पिवळा रंग म्हणजे संपत्ती आणि स्नेहाचं प्रतिक मानलं जातं.

हिरवा- हिरवा रंग स्कंदमाता देवीला आवडतो. सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक म्हणून हिरव्या रंगाची ओळख आहे.

करडा - कात्यायनी देवीचा आवडता म्हणजे करडा रंग. अधोगतीतून विकास आणि प्रकाशाच्या दिशेने वाट काढणे असा याचा अर्थ आहे.

भगवा - भगवा रंग म्हणजे भक्ती आणि शांते प्रतिक मानले जाते.

पांढरा - सर्व काही स्वच्छ आणि साफ असं पाढऱ्या रंगाचं महत्व आहे. पांढरा रंग म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात काहीही वाईट नसणे.

लाल - ‘ब्रम्हचारिणी’ देवीचा आवडता रंग लाल आहे. लाल रंग शक्तीचे प्रतीक आहे.

निळा - महागौरी देवीचा आवडीचा निळा आहे. हा रंग सुंदरता, दृढ विश्वासाचा आहे.

गुलाबी - गुलाबी सिध्दीदात्री देवीचा आवडता रंग असल्याचं म्हटलं जातं या रंगाचं महत्व म्हणजे प्रेम आणि सद्भाव आहे.

जांभळ - जांभळा हा रंग चंद्रघंटा देवीचा आवडता रंग आहे. जांभळ रंग साहस आणि सत्याचं प्रतिक असल्याचं म्हटलं जातं.

Significance of Nine Colors
Shardiya Navratri 2023 : नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ; अंबाबाई-तुळजापूरसह राज्यभरातील मंदिरे सजली, भाविकांची गर्दी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com