Benefits Of Rajgira : नवरात्रीत राजगिऱ्याचे लाडू खाताय ? फायदे वाचून थक्क व्हाल !

उपवासासोबत आरोग्याची काळजी घेणे हे देखील आपले काम आहे.
Benefits Of Chaulai
Benefits Of Chaulai Saam Tv

Benefits Of Chaulai : नवरात्रीच्या ९ दिवसांच्या उपवासात आपण अनेक उपवासाच्या पदार्थांची चव चाखतो. उपवासासोबत आरोग्याची काळजी घेणे हे देखील आपले काम आहे. अनेक उपवासाचे पदार्थ आहेत जे आपण नवरात्रीत खातो त्यापैकी एक राजगिरा.

राजगिऱ्याचा लाडू, पुरी, पराठा, पकोडे असे अनेक पदार्थ चवीने खाल्ले जातात. परंतु, याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे देखील होतात. चौलाई हे राजगिरा नावाच्या फुलांच्या वनस्पतीपासून मिळणारे धान्य आहे. राजगिराच्‍या पानात औषधी गुणधर्म असल्‍याची माहिती असून त्‍याच्‍या फुलांचा वापर सजावटीसाठी केला जातो. या वनस्पतीपासून मिळणारे धान्य किंवा बिया म्हणजे राजगिरा.

अभ्यासानुसार, राजगिरा हा कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास, रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करण्यास, ट्यूमरविरोधी क्रिया करण्यास, रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास आणि उच्च रक्तदाब आणि अशक्तपणाची स्थिती सुधारण्यास मदत करते. त्यात अँटी-एलर्जिक आणि अँटीऑक्सिडंट शक्ती देखील आहेत. जाणून घेऊया याचे फायदे (Benefits) कसे होतात.

Benefits Of Chaulai
Benefits Of Salt : काळे की, पांढरे मीठ ! कोणते आहे फायदेशीर? जाणून घ्या

१. राजगिरा हा कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे. राजगिऱ्याच्या धान्यांमध्ये दुप्पट कॅल्शियम असते. याला कच्च्या स्वरूपात खाल्ल्यास त्यातील जीवनसत्त्व क चे व कॅल्शियमचे शोषण वाढवते. कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव देखील होतो.

२. यामध्ये आहारातील फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थ वजन कमी करण्यासाठी उत्तम आहेत. तसेच, उच्च फायबर सामग्रीमुळे उपवासाच्या वेळी दीर्घ कालावधीसाठी पोट भरण्यास मदत होते.

३. राजगिरा धान्य हे जीवनसत्त्व (Vitamins) क चे पॉवरहाऊस आहे जे पांढऱ्या रक्त पेशींच्या दुरुस्ती आणि उत्पादनात मदत करते ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. तसेच यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक यांसारखे इतर खनिजांनी देखील ते समृद्ध आहे.

Benefits Of Chaulai
Navratri Food : नवरात्रीत शेंगदाण्याचे सेवन करताय? असंख्य फायदासोबत नुकसानही तितकेच !

४. राजगिरीचे धान्य हे खनिजे, विशेषत: लोहाचे समृद्ध स्त्रोत आहेत आणि ते जीवनसत्त्व ब आणि के चे सर्वात चांगले स्त्रोत मानले जाते. अशक्तपणा येणाऱ्यांनी याचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताची पातळी वाढते.

५. लठ्ठपणा आणि रक्तातील साखरेची वाढलेली पातळी या समस्यांना राजगिरा तोंड देण्यास मदत करते. राजगिरा धान्यापासून बनवलेल्या पिठात इंसुलिनची पातळी कमी करण्याचे आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे गुणधर्म आहेत ज्यामुळे ते मधुमेहींसाठी देखील सुपरफूड बनते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com