नवरात्र म्हणजे 'नऊ रात्र' असा संस्कृतमध्ये अर्थ आहे. हिंदू धर्मात 'नवरात्र' हा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. प्रत्येक दिवशी देवीला नऊ वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवली जाते. आज चा शुभ रंग हा पांढरा आहे. आज नवरात्रीचा पाचवा दिवस सुरु आहे. या दिवशी देवी 'स्कंदमातेचे' पूजन केले जाते. या दिवशी स्कंदमातेची शिकवण दिली जाते.
देवी स्कंदमाता
'देवी स्कंदमाता' ही कार्तिकेय स्वामींच्या नावाने सुद्धा ओळखली जाते. ही देवी कार्तिकेयची माता आहे. या कारणाने पार्वतीला सुद्धा स्कंद माता म्हंटले जाते. यात देवीला लाल-पिवळी वस्त्रे परिधान केली जातात. देवी ही गोऱ्या वर्णाची असते म्हणून पांढरे , लाल- पिवळे रंगाचे वस्त्र पाचव्या दिवशी वापरले जातात.
पांढऱ्या रंगाचे महत्व
स्कंदमाता देवीला समर्पित, पांढरा रंग पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता निर्माण करतो. तसेच देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पांढरा रंग वापरला जातो. या दिवशी, भगवान कार्तिकेयची माता स्कंदमाता हिचा सन्मान केला जातो. ती मातृप्रेम, पालनपोषण आणि शांतता दर्शवते. पांढरा परिधान केल्याने शांतता आणि आध्यात्मिक शुद्धता येते.
Edited By : Sakshi Jadhav