Navratri 2022 : नवरात्रीत कुटूच्या पीठाचे सेवन करताय? जाणून घ्या त्याचे असंख्य फायदे

उपवासाच्या दिवसात आपण बरेचसे असे पदार्थ खातो ज्याचे फायदे व तोटे आपल्याला माहित नसतात.
Navratri 2022
Navratri 2022Saam Tv

Navratri 2022 : नवरात्र म्हटलं की, व्रत-वैकल्य, पूजा-अर्चना आली. नवरात्री नवदुर्गेच्या पूजेसोबत तिचा उपवास देखील केला जातो. उपवासाच्या दिवसात आपण बरेचसे असे पदार्थ खातो ज्याचे फायदे व तोटे आपल्याला माहित नसतात.

उपवासात बरेच लोक कुटूच्या पीठाचे सेवन करतात. त्यापासून बनवलेली पुरे, वडे, पराठा, खिचडी, हलवा असे अनेक पदार्थ ते चवीने खातात. जाणून घेऊया, कुटूच्या पीठाचे फायदे व तोटे.

Navratri 2022
Navratri 2022 : मधुमेहींनी नवरात्रीच्या उपवासात 'हे' पदार्थ खाणे टाळा, अन्यथा...

कुटू म्हणजे बक्कीट पीठ. बक्कीट पीठ हे वन्य वनस्पती बक्कडच्या बियांपासून तयार केले जाते. या पीठाचा सर्वात जास्त वापर हा उत्तर भारतात होतो. हा पदार्थ ग्लुटन फ्री असून आरोग्यासाठी चांगला आहे.

कुटूचे फायदे -

कुटूमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे घटक आहेत. यात अँटीकँसर, अँटीइन्फ्लेमेटरी, अँटीडायबेटिक गुणधर्म तसेच उच्च रक्तदाबची स्थिती सुधारण्यासाठी आढळला जातो.

१. कुटूमध्ये फायबरचे प्रमाण अधिक आढळते ज्यामुळे आपले पोट दीर्घकाळ भरलेले असते. यातून शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळते. ज्यामुळे भूक कमी लागून वजन नियंत्रणामध्ये राहाते.

२. तज्ज्ञांच्या मते, हे फायबर समृध्द असलेले धान्य असून याचे सेवन केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच यातील फायबरमुळे रक्तातील साखरेची (Sugar) पातळी खूप वेगाने वाढण्यास प्रतिबंधित करते. ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहातो.

Navratri 2022
Navratri 2022 : नवरात्रीत शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी 'या' पेयांचे सेवन करा

३. यात फोलेट, जीवनसत्त्व (Vitamins) ब आणि जीवनसत्त्व ब ६ सारख्या आवश्यक पोषक पदार्थ देखील असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच यात असणारे जीवनसत्त्व इ व प्रथिन्यामुळे चेहरा चमकण्यास मदत होतो.

४. कुटूत कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. कॅल्शियम हा एक आवश्यक पौष्टिक पदार्थ आहे जो हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतो. तसेच याचे सेवन केल्यास केसांच्या इतर अनेक समस्यांपासून सुटका होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com