

आवळा, टरबूज आणि लिंबूपाणी हे किडनीसाठी उपयुक्त डिटॉक्स पेय आहेत.
हे पेय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि सूज कमी करतात.
युरिक अॅसिड नियंत्रित ठेवून किडनीचे कार्य सुधारतात.
दैनंदिन आहारात या पेयांचा समावेश केल्यास किडनी आरोग्य चांगले राहते.
आपल्या शरीरात किडनी हे सर्वात मेहनती अवयवांपैकी एक मानले जाते. किडनी दिवसाचे २४ तास काम करत असते. शरीरातील विषारी पदार्थ गाळणे, पदार्थांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आणि आवश्यक खनिजांचा साठा शरीरात करण्याचं काम किडनी करते. मात्र बहुतेक लोकांना त्यांच्या किडनीच्या आरोग्याबद्दल तेव्हा विचार येतो जेव्हा काहीतरी त्रास सुरू होतो. प्रत्यक्षात किडनीची काळजी घेणं अजिबात अवघड नाही. काही नैसर्गिक ज्यूसच्या मदतीने आणि ज्यूस रोज सेवन केल्याने किडनीचे आरोग्य सुधारू शकते आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
हर्बल चहा, नैसर्गिक फळांचा रस आणि डिटॉक्स ड्रिंक्स हे फक्त स्वादिष्टच नसतात. तर शरीरातील सूज कमी करणे, युरिनशी संबंधित तक्रारी दूर करणे आणि हायड्रेशन राखणे यासाठीही फायदेशीर होते. संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीसोबत या पेयांचा समावेश केल्याने किडनीचे कार्य सुधारतं आणि संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसतो.
आवळ्याचा रस किडनीसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. इंग्रजीत Indian Gooseberry म्हणून ओळखले जाणारे आवळे हे व्हिटॅमिन C आणि पॉलीफेनॉल्सने समृद्ध आहे. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात. जो किडनी डॅमेजचा एक प्रमुख कारण मानला जातो. त्यामुळे टॉक्सिन्स बाहेर काढण्यात मदत होते आणि सूज कमी करून किडनीच्या कार्य सुधारते.
टररबूजाचा रस देखील एक नैसर्गिक किडनी क्लींजर आहे. या रसात भरपूर पाणी असतं आणि त्यात सिट्रुलिन नावाचं घटक असतं जे शरीरातील अमोनिया आणि इतर विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं. त्यामध्ये प्यूरीनचं प्रमाण कमी असल्याने युरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतं.
याशिवाय, साखर न घातलेलं लिंबूपाणी ही किडनीसाठी एक साधी पण प्रभावी नैसर्गिक ड्रिंक आहे. दिवसाची सुरुवात एका ग्लास लिंबूपाण्याने केल्याने किडनी डिटॉक्स होण्यास मदत होते. लिंबूमध्ये आढळणारे सिट्रिक अॅसिड यूरीन साइट्रेटचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे कॅल्शियम ऑक्सालेट पथरी होण्यापासून संरक्षण मिळते. त्यामुळे आजपासूनच आपल्या दैनंदिन आहारात या ड्रिंक्सचा समावेश करा.
किडनी डॅमेज का होते?
शरीरात टॉक्सिन्स, युरिक अॅसिड आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल्यामुळे किडनीचं नुकसान होऊ शकतं.
किडनीसाठी कोणते ज्यूस फायदेशीर आहेत?
आवळ्याचा रस, टरबूजाचा रस आणि साखर न घातलेलं लिंबूपाणी हे किडनीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
हे पेय किती वेळा घ्यावे?
दिवसातून एकदा सकाळी किंवा दुपारी हे नैसर्गिक पेय घेतल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
यामुळे युरिक अॅसिड कमी होते का?
होय, या ज्यूसमध्ये नैसर्गिक घटक असल्याने युरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित राहते आणि किडनीवरील ताण कमी होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.