Narali Pornima Special Recipe: नारळी पौर्णिमेला बनवा नारळापासून चमचमीत स्वादिष्ट पदार्थ, पाहा रेसिपी

Narali Purnima Recipe: श्रावन पौर्णिमेच्या दिवशी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात असताना, महाराष्ट्रातील मच्छीमार नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
Narali Purnima 2023 Special Recipe
Narali Purnima 2023 Special RecipeSaam Tv
Published On

Narali Purnima Special Recipe :

श्रावन पौर्णिमेच्या दिवशी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात असताना, महाराष्ट्रातील मच्छीमार नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोळी समाजातील लोकांसाठी नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. श्रावन पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा, काजरी पौर्णिमा आणि श्रावणी पौर्णिमा या नावांनी ओळखली जाते.

नारळी हा शब्द नारळ (Coconut) या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ नारळ आहे. यामुळेच कोळी समाजातील लोक श्रावणी पौर्णिमा महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. या दिवशी मच्छिमार आपली बोट समुद्रात सोडण्यापूर्वी भगवान वरुण देवाला प्रसन्न करण्यासाठी समुद्रात नारळ अर्पण करतात. याशिवाय या दिवशी बनवले जाणारे पदार्थ हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असतात.

Narali Purnima 2023 Special Recipe
Narali Purnima 2023 : सण आयलाय गो नारळी पुनंवचा! नारळी पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या सणाबद्दलच्या खास गोष्टी

महाराष्ट्रातील लोक या दिवशी मुख्य अन्न म्हणून नारळापासून बनवलेला पदार्थ बनवतात. या दिवशी बनवलेल्या काही पदार्थांमध्ये नारळी भात (Rice), नारळी करंजी आणि नारळी वडी यांचा समावेश होतो. या खास प्रसंगी तुम्हीही तुमच्या घरी नारळापासून काही खास पदार्थ बनवू शकता, म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत स्वादिष्ट पदार्थांच्या सोप्या रेसिपी…

नारळी भात

नारळी भात तयार करताना शिजवलेला भात आणि खोवलेला नारळ अथ वा नारळाचे काढलेले दूध वापरले जाते. यामध्ये पदार्थाला गोडी आणण्यासाठी गुळाचा प्रामुख्याने वापर केला जातो. पदार्थाची चव वाढविण्यासाठी त्यात वेलची पूड, सुकामेवा यांचा वापर केला जातो. नारळाचा वापर करून विविध देशांमध्ये भाताच्या पाककृती केल्या जातात. त्या तिखट चवीच्याही असतात. भारताच्या विविध प्रांतात विशेषतः दक्षिण भारतात नारळी भाताच्या विविध प्रकारच्या पाककृती प्रचलित आहेत.

Narali Purnima 2023 Special Recipe
Narali Purnima 2023: नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ का अर्पण करतात?

नारळाच्या पोळ्या

नारळ आणि गूळ एकत्र करून मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत साधारण 10 ते 15 मिनीटे ढवळा, आता वेलचीपूड घालावी. थोड्यावेळ थंड व्हायला 2 ते 3 तास फ्रिजमध्ये ठेवा.मैदा आणि गव्हाचे पिठ एकत्र करावे. 2 टिस्पून कडकडीत गरम तेल घालावे. 1 चिमूटभर मिठ घालून ढवळावे. पाणी (Water) घालून घट्ट मळून घ्यावे. 1/2 तास झाकून ठेवावे. नारळाच्या मिश्रणाचे गोळे करून घ्यावे. तसेच भिजवलेल्या कणकेचे गोळे करावे. कणकेच्या गोळ्याची पुरी लाटून त्यामधे नारळाचा गोळा ठेवून पुरीच्या सर्व बाजू एकत्र करून बंद करावे. त्याची पोळी करून गरम तव्यावर करून तूप घालून खरपूस भाजून घ्याव्यात. गॅस मध्यम ठेवावा. आता नारळाच्या पोळ्या तयार आहेत. गार झाल्यावरही छान लागतात तसेच 3-4 दिवस टिकतात.

नारळाच्या करंज्या

करंजीचे सारण बनवण्यासाठी एक वाटी ओला नारळ व एक वाटी साखर यांचे मिश्रण करून ते कोरडे होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. गॅस बंद करून त्यात थोडी वेलची पूड आणि जायफळ घालावे. आता एक वाटी मैदा व एक वाटी बारीक रवा एकत्रीत करून घ्यावा. त्यात चार चमचे तेल गरम करून घालावे. दूध घालून घट्ट भिजवत ठेवावे. दोन तास असे ठेवा आणि मग त्याचे छोटे गोळे करा. पुरीसारखे लाटून घ्या आणि मग त्यात नारळाचे सारण घालून करंजी बनवा व गरम तेलात तळून घ्या. आता करंजी खाण्यासाठी तयार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com