Nagpanchmi Special 2022 : नागपंचमीच्या दिवशी नैवेद्याच्या थाळीत कोणते पदार्थ असायला हवे जाणून घ्या ?

नागपंचमीला नैवेद्याच्या ताटात हे पदार्थ ठेवा.
Nagpanchmi special thali, Food, Recipe
Nagpanchmi special thali, Food, Recipeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : श्रावण महिना सुरु झाला की, अनेक सणांची सुरुवात होते. त्यासाठी या संपूर्ण महिन्यात गोडाचे जेवण प्रत्येक महाराष्ट्रीयन घरी असते.

हे देखील पहा -

श्रावण महिन्यात येणारा पहिला सण हा नागपंचमी. या दिवशी घरोघरी नागाची पूजा विधीवत पध्दतीने केली जाते. हा सण श्रावण महिन्यात येणाऱ्या शुक्ल पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो. गावोगावी किंवा घराघरात स्त्रिया पाटावर हळद - चंदनाने नाग काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा व फुले वाहून त्याची पूजा करतात. तसेच पूजेसाठी गव्हाची खीर, चण्याची डाळ, गूळ व खोबरे यापासून उकडीची पुरणाची दिंडी किंवा कानोले बनवले जातात. हा श्रावणातला पहिला सण असल्यामुळे नैवेद्याच्या ताटात कोणते पदार्थ असायला हवे हे जाणून घेऊया.

नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर चढवायचा नसतो असे सांगितले जाते. मग अशावेळी आपण जेवण व नैवेद्याचे ताट कसे बनवायचे हा प्रश्न सर्वांना पडतो ते बनवायचे कसे हे जाणून घेऊया. या दिवशी पुरणाचे दिंडे कसे बनावायचे हे पाहूया.

Nagpanchmi special thali, Food, Recipe
Shravani somvar 2023 : श्रावण सोमवारी उपावास करताय तर या फळाचा ज्यूस प्या, राहाल दिवसभर हायड्रेट

पुरणाचे दिंडे

साहित्य -

चण्याची डाळ - १ वाटी

हळद - १ चमचा

तेल (Oil) - २ चमचे

गव्हाचे पीठ - १ १/२ वाटी

गूळ - अर्धी वाटी

जायफळ व वेलची पूड - चवीनुसार

मीठ - आवश्यकतेनुसार

पाणी (Water) - आवश्यकतेनुसार

कृती -

सर्वप्रथम डाळ स्वच्छ धूवून घ्या व तिला पाण्यात अर्धातास चांगली भिजू द्या. त्यानंतर कुकरमध्ये डाळ भिजेल इतके पाणी घालून घ्या. त्यात भिजवलेली डाळ, हळद व दीड चमचा तेल घालून पुरण शिजवून घ्या. दिंड्याच्या वरचे आवरण बनवताना आपण दीड वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्याचे पुरी सारखे कणीक मळून घ्या. आता आपण पुरण बनवताना डाळीतले पाणी गाळून घ्या. कढईमध्ये शिजवलेली चण्याची डाळ व गूळ घालून चांगले शिजवून घ्या. शिजल्यानंतर वरुन त्याच जायफळ व वेलची पूड घालून चांगले मिक्स करा. मळलेल्या गव्हाच्या पीठाचा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घ्या व त्यात पुरणाचा गोळा भरा. चपातीला चारही बाजूने बंद करुन त्याला वाफवून घ्या. वाफल्यानंतर त्याच्यावर वरुन तूपाची धार सोडा आणि नैवेद्याच्या थाळीत ठेवा.

तसेच नैवेद्याच्या थाळीत आपण कटाची आमची, गव्हाची खीर, भोपळ्याची भाजी, भजी, पापड, डाळ व पुरणाची दिंडी ठेवू शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com