
बॉलीवूड आणि बॉक्स ऑफिसवर छावाने मोठी डरकाळी फोडलीय. या डरकाळीचा आवाज सर्वत्र ऐकायला मिळत आहे. सिनेरसिक ते राजकीय नेत्यांमध्ये छावा चित्रपटाची चर्चा आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं. दरम्यान या चित्रपटामुळे लोक पुन्हा एकदा इतिहासाची पाने चाळत आहेत. औरंगजेब संदर्भात माहिती घेत आहेत. अन्यायी बादशाह औरंगजेबचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेतला जात आहे.
छावासोबत औरंगजेब नावाचा ट्रेंड का करत आहे, हे जाणून घेऊ. तसेच आपल्या अखेरच्या क्षणी औरंजेबच्या मनात काय चालू होते? त्याची अवस्था काय होती आणि औरंगजेबाचे शेवटचे शब्द काय होते हे प्रश्न अनेकजण विचार आहेत. आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत. छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडो रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज आणि त्यांनी मराठा समाजासाठी दिलेल्या बलिदानावर आधारित आहे.
'छावा'मध्ये विक्की कौशलने छत्रपती संभाजीची भूमिका साकारलीय. तर रश्मिका मंदाण्णाने येसूबाई भोसलेची भूमिका साकारलीय तर अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारलीय. याशिवाय आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग यांसारख्या दिग्गज कलाकारांनी जबरदस्त काम केलंय. चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी उत्तमप्रकारे चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय.
दरम्यान सोशल मीडियावर लोकांच्या सकारात्मक प्रतिसादासोबतच छावा चित्रपटाला माऊथ पब्लिसिटी लाभ मिळत आहे. 'छावा' या चित्रपटामुळे औरंगजेबच्या अत्याचाराची पुन्हा एकदा जोरात चर्चा होतेय. औरंगजेबाचा मृत्यू कसा झाला याबाबत चर्चा होतेय. इतिहासात अकबरचे वर्णन उदारमतवादी तर औरंगजेबाचे वर्णन मुघल इतिहासातील सर्वात कट्टरवादी आणि क्रूर सम्राट म्हणून केले गेलंय.
छत्रपती संभाजी महाराज यांचा निर्दयीपणे खून करणाऱ्या औरंगजेबला अखेरच्या दिवसात ही चिंता सतावत होती. अत्याचार होत असूनही छत्रपती संभाजी महाराजांच्या चेहऱ्यावर दु: ख नव्हतं. उलट त्यांच्या डोळ्यात बदला घेण्याची आग दिसत होती. महाराजांना पकडून सुद्धा औरंजेब चिंतेत होता. औरंगजेबाला सांसारिक गोष्टींपेक्षा धार्मिक (धार्मिक) गोष्टी जास्त आवडत होत्या. यामुळेच त्याच्या हॅरेममध्ये महिलांची संख्या कमी होती.
इतिहासकारांच्या मते औरंगजेब त्याच्या शेवटच्या क्षणी स्वतःशी बोलत होता. तो म्हणाला, 'अल्लाहने दिलेल्या दीर्घ आयुष्याची परत फेड मी करू शकलो नाही. मी त्यांना माझा चेहरा कसा दाखवू? एवढं बोलून त्याचं बोलणं बंद झालं होतं, पण ओठ मात्र काहीतरी बडबडत होते. त्यांचा मुलगा आझम शाह याने वडिलांच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. आझमने नतमस्तक होऊन वडिलांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते नीट ऐकून आलं नाही.
आपल्या अखेरच्या दिवशी औरंगजेबाने आपला धाकटा मुलगा कमबख्शला बोलावून आपली चिंता व्यक्त केली. 'माझ्या मृत्यूनंतर माझ्या लोकांना वाईट वागणूक दिली जाईल. मी जे लोकांसोबत केलं तेच माझ्या लोकांसोबत होईल. त्यांनी त्यांचा दुसरा आणि सर्वात आवडता मुलगा आझम शाह याला सांगितले, 'मी राजा म्हणून अपयशी ठरलोय. माझ्या अनमोल जीवाचा काही उपयोग झाला नाही.
अल्लाह सर्वत्र आहे, परंतु माझे दुर्दैव आहे की जेव्हा त्याला भेटण्याची वेळ येते तेव्हा मला त्यांची उपस्थिती जाणवत नाहीये. मी पापी आहे. कदाचित माझी पापे अशी नाहीत की त्यांना माफ करता येत नसेल. औरगंजेब मृत्यू जवळ आल्याने तो चिंतेत होता. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात राजा असहाय्य होता. तो प्रार्थनेत सांत्वन शोधत होता. मृत्यूच्या दिवशीही त्याने सकाळी प्रार्थना केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.