Mother's Day 2024 : 'मदर्स डे'ला स्पेशल बनवायचंय? मुंबईतील 'या' नयनरम्य ठिकाणी आईला नक्की घेऊन जा

Tourist Places in Mumbai For Mother's Day Celebration : मध्यमवर्गीय कुटुंबात आईने संपूर्ण मुंबई देखील पाहिलेली नसते. त्यामुळे आजच्या मदर्स डेला स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही आईला एका सुंदर ठिकाणी फिरण्यासाठी घेऊन जा.
Mother's Day 2024
Mother's Day 2024 Saam TV

आई म्हणजे आपल्या जीवनातील पहिला गुरू आहे. आई आपल्या मुलासाठी सर्व गोष्टींचा हसत हसत त्याग करते. आपल्या मुलांच्या वाटेत आलेल्या सर्व अडचणी दूर करते. आई आहे म्हणून हे जग सुंदर आहे. देव सगळीकडे जात नाही त्यामुळे आपल्या मदतीसाठी त्याने आई बनवली. आज या जगातील सर्वच मतांचा दिवस आहे. त्यामुळे आईसाठी आज काही स्पेशल करावं असा विचार तुम्हीही केला आहे का?

Mother's Day 2024
Mother's Day: कामानिमित्त घरापासून लांब आहात? मग 'मदर्स डे'ला अशा पद्धतीने आईला खुश करा

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात अनेक मध्यमवर्गीय कुटुंबात आईने संपूर्ण मुंबई देखील पाहिलेली नसते. त्यामुळे आजच्या मदर्स डेला स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही आईला एका सुंदर ठिकाणी फिरण्यासाठी घेऊन जा.

चौपाटी

आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत सुंदर क्षण घालवण्यासाठी आणि सुंदर आठवणी तयार करण्यासाठी तुम्ही चौपाटीला भेट द्या. मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू अशा काही निवडक चौपाटीला भेट दिल्याने आई देखील खुश होईल.

गार्डन

आईला तिच्या आवडीची सुंदर साडी नेसायला सांगा आणि तिला शहरातील एका सुंदर गार्डनमध्ये फिरण्यासाठी घेऊन जा. याने आईचं मन प्रसन्न राहील.

मंदिर

प्रत्येक आई ही दररोज आपल्यासाठी देवाची पूजा करते. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आईला बाहेर फिरायला घेऊन जाताना आधी एखाद्या मंदिरात घेऊन जा. आई ज्या देवाची किंवा महापुरुषांची पूजा करते त्यांच्या सृतीस्थळी आईला घेऊन जा.

KFC किंवा डॉमिनोज

आपण आपल्या मित्र परिवारासह नेहमीच या ठिकाणी चील करत असतो. आता तुमची आई देखील आपल्या मैत्रिणींसह येथे असेल तर उत्तम. पण आई जर अशा ठिकाणी कधी गेली नसेल तर तिला एकडे घेऊन जा. तिच्या आवडीचा पदार्थ मागवा. असं केल्याने आई फार खुश होईल.

दागिन्यांचे दुकान

प्रत्येक स्त्रीला दागिने फार आवडतात. तुम्ही नोकरी करत असाल तुम्हाला चांगला पगार असेल आणि आईसाठी तुम्हाला काही दागिना खरेदी करायचा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. तुम्ही आईला आज एखादा सुंदर दागिना गिफ्ट करू शकता.

Mother's Day 2024
Mothers Day 2024: मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मातृदिन? जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com