Workout In Summer: उन्हाळ्यात सकाळी की संध्याकाळी व्यायाम करणे फायदेशीर? जाणून घ्या

Morning Vs Evening Workout In Summer: उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात खूप जास्त उकाडा जाणवतो. या काळात व्यायाम करावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. उन्हाळ्यात व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
Workout
WorkoutCanva

Morning Vs Evening Workout In Summer:

उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात खूप जास्त उकाडा जाणवतो. या काळात व्यायाम करावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. उन्हाळ्यात सकाळी की संध्याकाळी व्यायाम करावा याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. उन्हाळ्यात व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात व्यायाम करण्यासाठी सकाळजी वेळ सर्वोत्तम आहे. सकाळी उन्हाची किरणे फार तीव्र नसतात. तसेच तापमानही जास्त नसते. त्यामुळे व्यायाम केल्यास तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही. सकाळच्या वेळी व्यायाम केल्यास तुमच्या शरीराला खूप फायदा होईल. (Latest News)

जर तुम्हाला सकाळी व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळी व्यायाम करु शकतात. परंतु संध्याकाळी फार कमी वेळ व्यायाम करा. संध्याकाळी जास्त व्यायाम करु नये. जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होते. यामुळे हृदयाचे, मुत्रपिंडाचे विकार होऊ शकतात. यामुळे उन्हाळ्यात जास्त व्यायाम करणे टाळा.

Workout
Salary News: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; खासगी कंपन्यांमध्येही होणार भरघोस पगारवाढ?

उन्हाळ्यात व्यायाम करताना या गोष्टी लक्षात घ्या

उन्हाळ्यात व्यायाम करताना तुम्ही भरपूर पाणी प्या. जास्त वेळ पाणी न प्यायल्याने तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात व्यायाम करताना तुमच्याजवळ ओला टॉवेल ठेवा. उन्हाळ्यात खूप जास्त गरम होते. त्यामुळे ओला टॉवेल असल्याने फायदा होईल.

उन्हाळ्यात तुम्ही व्यायाम करतात सूती किंवा कॉटनचे हलके कपडे घाला. जेणेकरुन तुम्हाला जास्त गरम होणार नाही.

जर तुम्ही उन्हाळ्यात घराबाहेर व्यायाम करत असाल तर सनस्क्रीन जरुर लावा. उन्हाळ्यात शक्यतो संध्याकाळी व्यायाम करणे टाळावे.

Workout
Relationship Tips : ब्रेकअप करण्यापूर्वी या ५ गोष्टी लक्षात ठेवा, नात्यातील दूरावा होईल कमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com