Chandra Grahan 2023 Sutak Time : वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण, भारतात सुतककाळ कधीपासून होणार सुरु? वाचा एका क्लिकवर

Kojagiri Purnima 2023 : चंद्रग्रहणात कोजागरी पौर्णिमा कशी साजरी कराल? सुतक काळात या चुका करु नका.
Chandra Grahan 2023 Sutak Time
Chandra Grahan 2023 Sutak TimeSaam Tv
Published On

Chandra Grahan 2023 Date :

आश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण २८ ऑक्टोबरला असून या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून याचा सुतककाळ ९ तासांपूर्वीच सुरु होणार आहे.

कोजागरी पौर्णिमेला हे चंद्रग्रहण होणार असून गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच या दिवशी रवियोग, बुधादित्य योग, षष्ठ योग, सिद्धी योग आणि सौभाग्य योग तयार होत आहे. हा योग तब्बल ३० वर्षांनंतर जुळून आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हे चंद्रग्रहण भारतात (India) दिसणार असून रात्री ११.३१ वाजता सुरु होईल. पण चंद्रग्रहणाचा पहिला स्पर्श रात्री ०१.०५ मिनिटांनी सुरु होणार आहे. त्यामुळे सुतक कालावधी दुपारी ०४. ०५ वाजता सुरु होईल. कोजागरी पौर्णिमेला असणारे खंडग्रास आंशिक चंद्रग्रहण याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सुतक काळात कोणत्या चुका करु नये हे जाणून घेऊया.

1. चंद्रग्रहण कधी ?

चंद्रग्रहण रात्री ११.३१ मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री ३.५६ मिनिटांनी संपेल. हे चंद्रग्रहण रात्री ०१.०५ मिनिटांनी स्पर्श करणार आहे. त्याचा मध्यकाळ हा पहाटे ०१.४४ वाजता असेल तर मोक्ष काळ पहाटे ०२.२४ वाजता असेल. १ तास १९ मिनिटांच्या या कालावधीत चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्वाधिक असणार आहे.

Chandra Grahan 2023 Sutak Time
Kojagiri Purnima 2023 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रग्रहणाचं सावट! जुळून येतोय महासंयोग, या राशींची होणार चांदी

2. सुतक काळात या चुका करु नका.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ हा आज संध्याकाळी ०४ वाजून ५ मिनिटांनी सुरु होणार आहे. सुतक काळात कोणतेही शुभ कार्य, धार्मिक विधी किंवा संकल्प करु नये. सुतक काळात भोजन करणे किंवा अन्न (Food) शिजवणे वर्ज्य मानले जाते. सुतक काळापूर्वी जेवणात तुळशीचे पान घालावे. ग्रहण काळात देवताचे ध्यान करावे असे म्हटले जाते.

3. चंद्रग्रहणात कोजागरी पौर्णिमा कशी साजरी कराल?

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण सुरु होण्यापूर्वी खीर (Kheer) तयार करा. खीर बनवल्यानंतर त्यामध्ये तुळशीची पाने घालून बाजूला ठेवा. ग्रहण संपल्यानंतर ही खीर चंद्रप्रकाशात ठेवावी. ग्रहण संपल्यानंतर स्नान केल्यानंतरच ही खीर खावी.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com