Best Deals : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 15 हजाराच्या आत तुम्हाला 5G चे हे स्मार्टफोन मिळू शकतील. अगदी कमी दरात हे स्मार्टफोन अगदी चांगले फीचर्स देत आहेत. 15 हजार रुपयांच्या आत येणार्या सर्वोत्तम 3 मोबाईलबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये जवळपास सर्व फीचर्स उपलब्ध असतील.
या फोनमध्ये तुम्हाला व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचा उत्तम अनुभव मिळेल. हा मोबाईल तुम्ही कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग अॅपवरूनही खरेदी करू शकता. तुम्हाला हे 3 उत्तम फोन Amazon वर Rs.15000 पेक्षा कमी किमतीत मिळत आहेत. या 3 फोन्सची खासियत काय आहेत जे त्यांना कमी बजेटमध्ये खास बनवतात.
1. Redmi 11 Prime 5G
तुम्हाला Redmi XI Prime सारखा मस्त फोन Amazon वर फक्त Rs.12,999 मध्ये मिळत आहे.
MediaTek Dimensity 700 Plus 5G, 2.2GHz पर्यंतचा 7 nm ऑक्टा-कोर प्रोसेसर या मोबाइलमध्ये उपलब्ध आहे.
या हँडसेटमध्ये तुम्हाला 90Hz फुल-एचडी प्लस (1080×2400) डिस्प्ले मिळत आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेल AI ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.
त्याच्या फ्रंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ किंवा सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
4GB RAM, 64GB UFS 2.2 स्टोरेज मिळत आहे.
तसेच तुम्हाला या फोनमध्ये मजबूत बॅटरी बॅकअप मिळत आहे, हा फोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh आहे. यामध्ये तुम्हाला फोनसोबत टाइप-सी चार्जरही मोफत मिळत आहे.
2. Samsung Galaxy M13 5G
15000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये, Samsung Galaxy M13 हा एक 5G मोबाइल आहे जो तुम्हाला फक्त 13999 रुपयांमध्ये मिळत आहे.
हा फोन सुपरफास्ट 5G फोन आहे. ऑक्टा-कोर 2.2GH सह Android 12 प्रोसेसर मिळत आहे.
हे 6.5 इंच एचडी प्लस रिझोल्यूशनसह उपलब्ध आहे.
या फोनमध्ये 50 मेगापिक्सेल प्लस 2 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप आहे आणि समोर 5 मेगापिक्सेल आहे.
तुम्हाला हा फोन Amazon वर Rs.13999 मध्ये 18% डिस्काउंटसह मिळत आहे.
3. Lava Blaze 5G
तुम्हाला Lava Blaze 5G मोबाईल फक्त रु.11499 मध्ये मिळत आहे.
हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसरसह मिळत आहे.
6.5-इंच फुल एचडी डिस्प्ले मिळत आहे.
या फोनमध्ये (Phone) तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 50 मेगापिक्सेलचा AI मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.