Milk Purity Check Video : तुमच्या घरात येणारं दूध शुद्ध आहे का? काही सेंकदात ओळखू शकता

Milk Testing at Home: हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या दुधाची शुद्धता (Tips To Check Purity Of Milk) ओळखू शकता.
Milk Purity Check Video
Milk Purity Check Videosaam tv
Published On

Milk Purity Check Tips : दूध ही एक अशी गोष्ट आहे ज्याचे सेवन लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण करतात. कॅल्शियम आणि प्रोटीनने भरपूर असलेले दूध शरीराला ताकद देते आणि हाडे मजबूत करते. पण आजच्या काळात शुद्ध दूध (Pure Milk) मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत भेसळयुक्त दूध प्यायल्याने त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

साधारणपणे पॅकेटमध्ये असलेल्या दुधात काय आहे (How To Check Milk Adulteration) हे आधीच लिहिलेले असते. पण जे बाहेरून दूध घेतात किंवा तबेल्यातून दूध घेतात त्या दुधात बहुतेक वेळा पाणी मिसळलेले असते. यासंदर्भात FSSAI ने एका व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या दुधाची शुद्धता (Tips To Check Purity Of Milk) ओळखू शकता. दुधात पाणी मिसळले आहे की नाही हे कसे तपासायचे हे जाणून घेऊया...

Milk Purity Check Video
Onion Hair Serum : केसांची वाढ होत नाहीये ? केसगळतीने त्रस्त आहात ? कांद्याचे सिरम ठरेल फायदेशीर

भेसळयुक्त दुधाचा आरोग्यावर होतो वाईट परिणाम

आजच्या काळात शुद्ध दूध मिळणे फार कठीण झाले आहे. बाजारात शुद्ध दुधाऐवजी भेसळयुक्त दूध मिळते. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हे दूध प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. दुसरीकडे ज्या दुधात पाणी मिसळले आहे ते प्यायल्यानेही शारीराला फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या दुधात भेसळ आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे ठरते. (Oats Recipes)

Milk Purity Check Video
Oats Recipes : तुम्ही ओट्सचे हे चविष्ट आणि हेल्दी पदार्थ बनवू शकता, रेसिपी बघाच

दुधातील भेसळ कशी तपासायची

FSSAI ने शेअर केलेला व्हिडिओ पाहून दुधात पाण्याची भेसळ आहे की नाही हे 1 मिनिटात कोणालाही कळू शकते. यासाठी तुम्हाला कोणतीही अॅक्सेसरीज किंवा किट खरेदी करण्याची गरज भासणार नाही. दुधाची चाचणी करण्यासाठी प्रथम काचेची प्लेट किंवा स्लाइड घ्या आणि त्यावर दुधाचा एक थेंब टाका. तो थेंब लगेच खाली वाहतो की हळू हळू खाली जातो हे पहा.

जर घरात येणारे दूध भेसळयुक्त नसेल तर दूध हळू हळू स्लाइडच्या खाली जाईल आणि तुमच्या घरात येणारे दूध जर भेसळयुक्त असेल तर तो थेंब स्लाइडवर टाकताच पाण्यासारखा लगेच खाली वाहून जाईल. हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या दुधात पाण्याची भेसळ आहे की नाही हे तपासू शकता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com