Mental Health : स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करा 'या' 5 गोष्टी

नियमित व्यायाम आणि सकस आहार घेतल्याने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते.
Mental Health
Mental HealthSaam Tv
Published On

Mental Health : निरोगी जीवनशैली आणि दैनंदिन चक्राचे एकूण आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. नियमित व्यायाम आणि सकस आहार घेतल्याने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते. निरोगी शरीरासाठी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासोबतच मानसिक आरोग्य सुदृढ करणेही आवश्यक आहे.

यासाठी मोकळ्या वेळेत असे छंद जोपासा, जे तुम्हाला फ्रेश वाटण्यासोबतच तुमचे मनही निरोगी बनवू शकतात. असे छंद जोपासल्याने एकाग्रता वाढते. स्मरणशक्ती मजबूत राहाते. सर्व प्रकारच्या मानसिक आजारांपासून संरक्षण करते. चला जाणून घेऊया कोणते छंद मनाला निरोगी आणि आनंदी ठेवण्यास मदत करतात.

Mental Health
Mental Stress : बुद्धिबळ व फुटबॉल खेळल्यानेही तणाव कमी होतो का ? जाणून घ्या, काय म्हणते संशोधन

1. नवीन गोष्टी शिका

Greatist.com च्या मते, प्रत्येकाला संगीत ऐकायला आवडते. अनेकदा लोकांना मूड हलका करण्यासाठी संगीत ऐकतात. अशा परिस्थितीत संगीत हा छंद जोपासू शकतात ज्यामुळे फायदा होऊ शकतो. संगीत वाजवण्याने केवळ मन ताजेतवाने होत नाही तर भावनिक आरोग्य देखील सुधारते, तणाव आणि चिंता कमी होते आणि सामाजिक होण्यास मदत होते.

2. मोकळ्या वेळेत कोडी सोडवा

मुलं (Child) अनेकदा कोडी खेळतात, पण हा खेळ केवळ टाईमपासचं साधन नसून मेंदूला हुशार आणि तरुण ठेवण्याचाही एक चांगला मार्ग आहे. हे मेंदू सक्रिय करते आणि संज्ञानात्मक कार्ये सुधारते.

3. विणकाम सुरू करा

घरातील स्त्रिया (Women) हिवाळ्यात अनेकदा विणकाम करतात. विणकाम हा छंद बनवल्याने रक्तदाबावर नियंत्रण मिळते, तसेच नैराश्य, चिंता, एकटेपणा यासारख्या भावनांपासून मुक्ती मिळते.

Playing game
Playing game Canva

4. रंगांचा उपयोग

लहानपणापासून प्रत्येकाला चित्रकला आवडते. चित्रकला ताणतणावाचे काम करते आणि मन शांत करण्यास मदत करते. याशिवाय चित्रकला तुमच्या मनाला नवीन प्रेरणा देण्याचे काम करते.

5. स्वत:ला भेट वस्तू द्या

रंगीबेरंगी सुंदर मेणबत्त्या बघूनच मनाला बरे वाटू लागते. मेंदूच्या आरोग्यासाठी घरी मेणबत्त्या बनवणे हा देखील एक चांगला छंद असू शकतो. यामुळे तुमचे मन एकाग्र होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com