Mother's Day: मदर्स डे बनवा खास! आईला घेऊन 'या' सुंदर आणि पवित्र धार्मिक स्थळांवर नक्की भेट द्या

Mothers Day Special: देशभरातील अनेक तीर्थस्थळे आहेत जिथे तुम्ही दोन ते तीन दिवसांची आरामदायी सुट्टी घेऊन मदर्स डे सेलिब्रेशनसह छोट्या सहलीचा आनंद घेऊ शकता.
Mother's Day
Mother's Dayfreepik
Published On

प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यावर्षी, ११ मे २०२५ रोजी मातृदिन साजरा केला जात आहे. हा दिवस आईच्या प्रेम, काळजी आणि त्यागासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. आई केवळ जन्म देत नाही, तर तिचे जीवन संतानासाठी समर्पित असते. तिच्या नात्याचे सुरुवात जन्मापूर्वीच होते, आणि या अनमोल नात्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो.

या मदर्स डे ला तुम्ही तुमच्या आईसोबत देवाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता. देशभरातील अनेक अशा स्थळांवर दोन ते तीन दिवसांची छोटी, आरामदायक सहल करता येईल. येथे काही धार्मिक स्थळांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, जिथे तुम्ही आईसोबत मदर्स डे सेलिब्रेट करू शकता.

वाराणसी

वाराणसी, गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले भगवान शिवाचे प्रिय शहर, येथे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे. मदर्स डे च्या दिवशी तुमच्या आईसोबत बनारसला भेट देऊन गंगा आरतीचा अनुभव घ्या, बोटिंगचा आनंद घ्या, काशी विश्वनाथ मंदिराला भेट द्या आणि बनारसच्या स्ट्रीट फूडचा स्वाद घ्या.

मथुरा-वृंदावन

मथुरा आणि वृंदावन, श्रीकृष्णाच्या लीलांचे साक्षीदार, कुटुंबासोबत भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे कृष्ण जन्मभूमी, यमुना घाट, बांके बिहारी मंदिर आणि प्रेम मंदिरासारखी सुंदर प्राचीन मंदिरे पाहता येतात. श्रीकृष्णाच्या बाललीलांचा अनुभव घेत एक अध्यात्मिक सहल इथे तुम्ही आनंदाने घालवू शकता.

हरिद्वार

मे महिन्यातील उष्णतेपासून सुटण्यासाठी आणि मदर्स डे खास बनवण्यासाठी तुम्ही आईसोबत हरिद्वारला जाऊ शकता. हर की पौडीवर गंगास्नान केल्याने थंडावा मिळतो आणि पापमुक्ती मिळते, असे मानले जाते. तसेच मनसा देवी आणि चंडी देवी मंदिराच्या दर्शनाचा शुभ अनुभवही येथे घेता येतो.

नैना देवी मंदिर

या हंगामात आईसोबत शांत सहलीचा अनुभव घ्यायचा असेल, तर नैनिताल हे उत्तम ठिकाण आहे. नैनी तलावाच्या काठावर वसलेले हे सुंदर हिल स्टेशन नैना देवी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथे माता सतीचे डोळे पडल्याचे मानले जाते आणि वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com