How To Make Makeup Remover Wipes : घरच्या घरी असा बनवा मेकअप रिमूव्हर वाइप्स, आता कोणत्याच तेलाची गरज नाही !

मेकअप रिमूव्हर करायची वेळ येते तेव्हा डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी डोळ्यांना बराच वेळ घासावे लागते.
How To Make Makeup Remover Wipes
How To Make Makeup Remover Wipes Saam Tv
Published On: 

How To Make Makeup Remover Wipes : मेकअप करायला प्रत्येक मुलीला आवडते आणि केलेला मेकअप रिमूव्हर करायची वेळ येते तेव्हा डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी डोळ्यांना बराच वेळ घासावे लागते; ज्यामुळे तुमच्या डोळ्यांनाही हानी पोहोचते म्हणून तुमची फार चिडचिड होते आणि त्यात रिमूव्हर संपला असेल तर विचारूच नका. तर आता तुमची चिंता मिटली समजा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय घरी मेकअप रिमूव्हर बनवण्याचा सोपा उपाय.

घरी आय मेकअप रिमूव्हर वाइप्स कसे बनवायचे -

रोझ वॉटर रिमूव्हर वाइप्स -

यासाठी अर्धा कप गुलाब जल,अर्धा चमचा बदाम तेल (Oil) आणि 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा. मग हे मेकअप रिमूव्हर एका छोट्या बॉक्समध्ये भरून साठवा. यामुळे तुमच्या डोळ्यांचा मेकअप सहज स्वच्छ होतो आणि तुमच्या डोळ्यांना कसला त्रास सुद्धा होत नाही.

How To Make Makeup Remover Wipes
Makeup Tips: फाउंडेशन लावताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर चेहरा होईल खराब

जोजोबा ऑइल रिमूव्हर वाइप्स -

जोजोबा तेलाला नैसर्गिक (Nature) मेकअप रिमूव्हर म्हणूनही ओळखले जाते. विशेषत: डोळ्यांचा मेकअप स्वच्छ करण्यासाठी हे सर्वोत्तम आहे. यासाठी एका बाटलीत थोडे गुलाबजल आणि जोजोबा तेल मिसळा. त्यानंतर तुम्ही डोळ्यांचा मेकअप काढा.

कोरफड -

कोरफडीचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. आपण ते मेकअप रिमूव्हर म्हणून देखील वापरू शकता. यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये कोरफड पाणी मिसळा. हे त्वचेतील घाण काढून टाकते.

How To Make Makeup Remover Wipes
Eye Makeup Tips : डोळ्यांना अधिक आकर्षक करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

मध -

आपण मध आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळू शकता आणि मेकअप रिमूव्हर म्हणून वापरू शकता. हे संयोजन तुमच्या त्वचेसाठी उत्तम क्लीन्झर आणि एक्सफोलिएटर म्हणून काम करते.

कच्चे दुध -

मेकअप काढण्यासाठी कच्च्या थंड दुधाचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी, तुम्ही एका छोट्या भांड्यात काही कापसाचे गोळे दुधात बुडवून या कॉटन बॉलच्या मदतीने त्वचेवरील मेकअप उत्पादने काढून टाकू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.