Pudina Kachori Recipe : नाश्त्यात बनवा चविष्ट अशी पुदिना कचोरी, पाहा रेसिपी

Recipe : गरमीचे दिवस चालू झाले आहेत. अशातच या दिवसांमध्ये शरीराला आतमधून थंड आणि तरोताजे ठेवण्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन म्हणजे पुदिना.
 Pudina Kachori Recipe
Pudina Kachori RecipeSaam TV
Published On

Recipe Of Pudina Kachori : गरमीचे दिवस चालू झाले आहेत. अशातच या दिवसांमध्ये शरीराला आतमधून थंड आणि तरोताजे ठेवण्यासाठी सर्वात चांगला ऑप्शन म्हणजे पुदिना. पुदिना खाण्यासोबत आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत गुणकारी असतो. तुम्ही आतापर्यंत रायता, चटणी, पराठा अशा अनेक पदार्थांमध्ये पुदिन्याचा वापर केला असेल.

परंतु तुम्ही कधी पुदिन्याची कचोरीबद्दल ऐकले आहे का ? नसेल तर जाणून घ्या पुदिन्याची कचोरी. पुदिन्याची कचोरी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे (Money) आणि मेहनत लागणार नाही. तुम्ही एकदातरी ब्रेकफास्ट किंवा लंचसाठी ही पुदिन्याची चविष्ट कचोरी बनवून खाल्ली पाहिजे.

 Pudina Kachori Recipe
Chikoo Peels Recipe : चिकूच्या सालीपासून बनवा चविष्ट असे पदार्थ !

पुदिना कचोरी रेसीपी -

एक कप पीठ, एक कप पुदिना, एक चमचा जिरे, बेकींग सोडा, हिरव्या मिरच्या, तेल, अदरक 1, धने पूड, बडीशोप पूड, हिंग, मिठ चवनुसार

 Pudina Kachori Recipe
Pudina Chutney Recipe : पोटाची जळजळ थांबवण्यासाठी पुदिन्याची चटणी ठरेल फायदेशीर, पाहा रेसीपी

बनवण्याची पद्धत -

  • सर्वात आधी पुदिन्याच्या पानांना स्वच्छ (Clean) पाण्याने धुवून घ्या आणि कापून वेगवेगळे ठेवून द्या.

  • आता एका भांड्यामध्ये पीठ घ्या त्यामध्ये पुदिण्यासोबत जिरे, बेकींग सोडा, हिरव्या मिरच्या आणि मिठ टाकून पीठ मळून घ्या.

  • आता या पिठाला 12 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. 12 मिनिटे झाल्यावर पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि त्यांना कचोरीचा आकार द्या.

  • आता एका कढईमध्ये तेल गरम करा आणि सगळ्या कचोऱ्या चांगल्या प्रकारे तळून घ्या.

  • आता या कचोऱ्या लोंनच्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com